S M L

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

23 सप्टेंबरचंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात गुंजेवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात काल बिबट्या शिरून एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात आरोग्य केंद्रातील महिला परिचारीका ठार झाली. वैद्यकीय अधिकारी शालिनी पटले यांच्यासोबत बोलत असतांना अचानक या बिबट्याने हल्ला केला. या हल्यामुळे गावात भितीचं वातावरण पसरल्ंाय. ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील गेल्या 10 दिवसातील ही दूसरी घटना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गुंजेवाही गावापासून केवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हे केंद्र वनपरिक्षेत्रात येतं. त्यामुळे इथं वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. या बिबट्याला जेरंबद करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली. वनविभागानंही या बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरु केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 23, 2011 11:14 AM IST

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

23 सप्टेंबर

चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात गुंजेवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात काल बिबट्या शिरून एका महिलेवर हल्ला केला. या हल्ल्यात आरोग्य केंद्रातील महिला परिचारीका ठार झाली. वैद्यकीय अधिकारी शालिनी पटले यांच्यासोबत बोलत असतांना अचानक या बिबट्याने हल्ला केला. या हल्यामुळे गावात भितीचं वातावरण पसरल्ंाय. ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील गेल्या 10 दिवसातील ही दूसरी घटना आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र गुंजेवाही गावापासून केवळ 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हे केंद्र वनपरिक्षेत्रात येतं. त्यामुळे इथं वन्यप्राण्यांचा सतत वावर असतो. या बिबट्याला जेरंबद करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली. वनविभागानंही या बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरु केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 23, 2011 11:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close