S M L

डोंबिवलीत हैदास घालणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड

24 सप्टेंबरभिंतीला भगदाड पाडून आणि घरांचे कुलूप तोडून दरोडा टाकणार्‍या एका टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली. गेल्या काही महिन्यात डोंबिवली परिसरात चोरी आणि दरोड्याचं प्रमाण वाढलं होतं. रामनगर पोलिसांच्या डीटेंशन ब्राँचने मोठ्या हुशारीने या टोळीला गजाआड केलंय. दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या राजू ओमसाई रोशन, दिपक विका आणि किशन साही तीन तरुणांना रामनगर पोलिसांनी अटक केली. हे तिघे तरुण वॉचमन म्हणून नोकरीत करत चोरी करणार्‍या ठिकाणांची टेहळणी करायचे. आणि वेळ बघून दरोडा टाकायचे. या तिघांना अटक केल्याने डोंबिवली परिसरातील 14 घरफोडी आणि दरोड्याच्या घटना उघडकीस आल्यात. पोलिसांनी या तिघांकडून त्यांनी चोरलेला मुद्देमालही जप्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2011 12:27 PM IST

डोंबिवलीत हैदास घालणारी दरोडेखोरांची टोळी गजाआड

24 सप्टेंबर

भिंतीला भगदाड पाडून आणि घरांचे कुलूप तोडून दरोडा टाकणार्‍या एका टोळीला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अटक केली. गेल्या काही महिन्यात डोंबिवली परिसरात चोरी आणि दरोड्याचं प्रमाण वाढलं होतं. रामनगर पोलिसांच्या डीटेंशन ब्राँचने मोठ्या हुशारीने या टोळीला गजाआड केलंय. दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या राजू ओमसाई रोशन, दिपक विका आणि किशन साही तीन तरुणांना रामनगर पोलिसांनी अटक केली. हे तिघे तरुण वॉचमन म्हणून नोकरीत करत चोरी करणार्‍या ठिकाणांची टेहळणी करायचे. आणि वेळ बघून दरोडा टाकायचे. या तिघांना अटक केल्याने डोंबिवली परिसरातील 14 घरफोडी आणि दरोड्याच्या घटना उघडकीस आल्यात. पोलिसांनी या तिघांकडून त्यांनी चोरलेला मुद्देमालही जप्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2011 12:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close