S M L

जो 16 व्या वर्षी घाबरला नाही तो आता कसा घाबरेल !

24 सप्टेंबरमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आपल्या पुस्तकातून चिखलफेक करणार्‍या शोएब अख्तरवर सर्वत्र टीका होत आहे. सचिन सोळाव्या वर्षी घाबरला नव्हता तर आता कसा घाबरेल अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमने दिली. आपल्या पुस्तकाचा खप व्हावा यासाठीच शोएबने अशा प्रकारचा खटाटोप करत असल्याचं मत वसिम यांनी व्यक्त केलं.शोएब अख्तर यांने काल आपल्या 'कॉन्ट्रोव्हर्शली युवर्स' या आत्मचरित्रात सचिन आपल्या बॉलिंगला घाबरत होता असं शोएबने म्हटलंय. आपण करिअरमध्ये टॉपला होतो तेव्हा सचिनही आपल्याला बिचकून खेळत होता असा शोएबचा दावा आहे. आपण मैदानात अनेकवेळा चेंडू कुरतडल्याची कबुलीही त्यानं दिली. तसेच सचिन आणि द्रविड यांच्या खेळाडूंसाठी मी भिन्न मत व्यक्त करतो.माझ्या दृष्टीकोनातून ते कधीच मॅच विनर खेळाडू नव्हते.तर भरात भर ललित मोदी आणि शाहरुख खान यांना आपण आयपीएलमध्ये नको होतो. त्यांच्यामुळेच आपलं आयपीएल करिअर संपुष्टात आलं असंही त्याने चरित्रात म्हटलंय. शिवाय पाकिस्तानमधील काही सीनिअर क्रिकेटर्सवरही त्याने ताशेरे ओढलेत. जेव्हा कधी आम्ही भारतात खेळलो, त्यावेळी फिक्सर्सनी आपल्याशी संपर्क साधला असंही शोएबनं म्हटलं आहे. आता पाकिस्तनचे माजी क्रिकेटर वसिम अक्रमने शोएबचा समाचार घेत हा खुलासा आपलं आत्मचरित्र विकण्यासाठी खटाटोप आहे असा टोला लगावला. जो सचिन 16 व्या वर्षी घाबरला नव्हता तर आता कसा घाबरेल अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमने दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 24, 2011 10:51 AM IST

जो 16 व्या वर्षी घाबरला नाही तो आता कसा घाबरेल !

24 सप्टेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आपल्या पुस्तकातून चिखलफेक करणार्‍या शोएब अख्तरवर सर्वत्र टीका होत आहे. सचिन सोळाव्या वर्षी घाबरला नव्हता तर आता कसा घाबरेल अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमने दिली. आपल्या पुस्तकाचा खप व्हावा यासाठीच शोएबने अशा प्रकारचा खटाटोप करत असल्याचं मत वसिम यांनी व्यक्त केलं.

शोएब अख्तर यांने काल आपल्या 'कॉन्ट्रोव्हर्शली युवर्स' या आत्मचरित्रात सचिन आपल्या बॉलिंगला घाबरत होता असं शोएबने म्हटलंय. आपण करिअरमध्ये टॉपला होतो तेव्हा सचिनही आपल्याला बिचकून खेळत होता असा शोएबचा दावा आहे. आपण मैदानात अनेकवेळा चेंडू कुरतडल्याची कबुलीही त्यानं दिली. तसेच सचिन आणि द्रविड यांच्या खेळाडूंसाठी मी भिन्न मत व्यक्त करतो.माझ्या दृष्टीकोनातून ते कधीच मॅच विनर खेळाडू नव्हते.

तर भरात भर ललित मोदी आणि शाहरुख खान यांना आपण आयपीएलमध्ये नको होतो. त्यांच्यामुळेच आपलं आयपीएल करिअर संपुष्टात आलं असंही त्याने चरित्रात म्हटलंय. शिवाय पाकिस्तानमधील काही सीनिअर क्रिकेटर्सवरही त्याने ताशेरे ओढलेत. जेव्हा कधी आम्ही भारतात खेळलो, त्यावेळी फिक्सर्सनी आपल्याशी संपर्क साधला असंही शोएबनं म्हटलं आहे. आता पाकिस्तनचे माजी क्रिकेटर वसिम अक्रमने शोएबचा समाचार घेत हा खुलासा आपलं आत्मचरित्र विकण्यासाठी खटाटोप आहे असा टोला लगावला. जो सचिन 16 व्या वर्षी घाबरला नव्हता तर आता कसा घाबरेल अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी क्रिकेटर वसिम अक्रमने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2011 10:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close