S M L

टू जी प्रकरणी प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधानांची न्यूयॉर्कमध्ये चर्चा

25 सप्टेंबरटू जी घोटाळ्याप्रकरणी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात न्यूयॉर्कमध्ये चर्चा सुरू आहे. अर्थमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या टू जी बद्दलच्या एका पत्रामुळे पी. चिदंबरम अडचणीत सापडले आहेत. टू जी घोटाळ्यामध्ये पी. चिदंबरम यांचा सहभाग आहे का यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधकांची टिकेची धार थोडी कमी होईल अशी आशा प्रणव मुखजीर्ंना वाटतेय. पंतप्रधानांना भेटण्याआधी प्रणव मुखजीर्ंनी चिदंबरम यांचीही भेट घेतली. दरम्यान, टू जी घोटाळ्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपला पंतप्रधानांनी पुन्हा उत्तर दिलं आहे. चिदंबरम यांना अटक करण्याची मागणी भाजपने केली होती. पण विरोधकांचे कामच विरोध करणं असतं अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली. मला माझ्या मंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे असं सांगत चिदंबरम यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असंही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 25, 2011 04:43 PM IST

टू जी प्रकरणी प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधानांची न्यूयॉर्कमध्ये चर्चा

25 सप्टेंबर

टू जी घोटाळ्याप्रकरणी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यात न्यूयॉर्कमध्ये चर्चा सुरू आहे. अर्थमंत्रालयाने पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या टू जी बद्दलच्या एका पत्रामुळे पी. चिदंबरम अडचणीत सापडले आहेत. टू जी घोटाळ्यामध्ये पी. चिदंबरम यांचा सहभाग आहे का यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. विरोधकांची टिकेची धार थोडी कमी होईल अशी आशा प्रणव मुखजीर्ंना वाटतेय. पंतप्रधानांना भेटण्याआधी प्रणव मुखजीर्ंनी चिदंबरम यांचीही भेट घेतली. दरम्यान, टू जी घोटाळ्यावरुन आक्रमक झालेल्या भाजपला पंतप्रधानांनी पुन्हा उत्तर दिलं आहे. चिदंबरम यांना अटक करण्याची मागणी भाजपने केली होती. पण विरोधकांचे कामच विरोध करणं असतं अशी प्रतिक्रिया पंतप्रधानांनी दिली. मला माझ्या मंत्र्यांवर पूर्ण विश्वास आहे असं सांगत चिदंबरम यांनी राजीनामा देण्याची गरज नाही असंही पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 25, 2011 04:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close