S M L

सचिन उद्या जाणार नव्या घरी रहायला

27 सप्टेंबरमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या त्याच्या नव्या बंगल्यात रहायला जाणार आहे. बांद्र्यात पेरी क्रॉस रोडवर सचिनचे हे नवं पाच मजली घर आहे. घटस्थापनेच्या मुहुर्तावर सचिन आपल्या कुटुंबीयांसह या घरात रहायला जाईल. सचिनचं हे घर खास त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बांधण्यात आलं आहे. बेसमेंटमध्ये 40 ते 50 गाड्या पार्क करता येतील इतकं मोठं पार्किंग आहे. शिवाय बेसमेंटमध्येच किचन आणि सर्व्हंट क्वार्ट्स असतील. तर तळ मजल्यावर मोठा दिवाणखाना तसेच गणेशाचं एक मंदिरही असणार आहे. शिवाय सचिनने आतापर्यंत जिंकलेल्या ट्रॉफी मांडण्यासाठी दिवाणखान्यात खास जागा करण्यात आली आहेत. युफओ (UFO) मूव्हीज कंपनीने कुठलीही नवी फिल्म सचिनला घरीच आणि अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो बघता यावी यासाठी त्याच्या घरी मिनी थिएटर उभारलं आहे. हे थिएटरही तळ मजल्यावर असणार आहेत. वरचे दोन मजले सचिन आणि त्याच्या कुंटुंबीयांसाठी असतील आणि यात स्विमिंग पूल आणि जिम्नॅशिअमही आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2011 12:35 PM IST

सचिन उद्या जाणार नव्या घरी रहायला

27 सप्टेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उद्या त्याच्या नव्या बंगल्यात रहायला जाणार आहे. बांद्र्यात पेरी क्रॉस रोडवर सचिनचे हे नवं पाच मजली घर आहे. घटस्थापनेच्या मुहुर्तावर सचिन आपल्या कुटुंबीयांसह या घरात रहायला जाईल. सचिनचं हे घर खास त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बांधण्यात आलं आहे. बेसमेंटमध्ये 40 ते 50 गाड्या पार्क करता येतील इतकं मोठं पार्किंग आहे. शिवाय बेसमेंटमध्येच किचन आणि सर्व्हंट क्वार्ट्स असतील. तर तळ मजल्यावर मोठा दिवाणखाना तसेच गणेशाचं एक मंदिरही असणार आहे. शिवाय सचिनने आतापर्यंत जिंकलेल्या ट्रॉफी मांडण्यासाठी दिवाणखान्यात खास जागा करण्यात आली आहेत. युफओ (UFO) मूव्हीज कंपनीने कुठलीही नवी फिल्म सचिनला घरीच आणि अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो बघता यावी यासाठी त्याच्या घरी मिनी थिएटर उभारलं आहे. हे थिएटरही तळ मजल्यावर असणार आहेत. वरचे दोन मजले सचिन आणि त्याच्या कुंटुंबीयांसाठी असतील आणि यात स्विमिंग पूल आणि जिम्नॅशिअमही आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2011 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close