S M L

इंदौर वन डे मध्ये इंग्लंडपुढं 293 रन्सचं आव्हान

17 नोव्हेंबर, इंदौर इंदौर इथं सुरु असलेल्या वन डेत भारताने इंग्लंड समोर विजयासाठी 293 रन्सचं आव्हान ठेवलंय. युवराज सिंगची सेंच्युरी आणि शेवटच्या क्षणी युसुफ पठाणने केलेली फटकेबाज हाफ सेंच्युरी हे भारतीय इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. सातव्याच ओव्हरमध्ये भारताची अवस्था तीन विकेटवर 29 रन्स अशी बिकट झाली होती. पण युवराज आणि गंभीरने इनिंग सावरली. चौथ्या विकेटसाठी त्यांनी 134 रन्सची दणदणीत पार्टनरशिप केली. गौतम गंभीरने करिअरमधली तेरावी हाफ सेंच्युरी करताना 71 रन्स केले. इंग्लंडच्या कोणत्याच बॉलर्सना या जोडीने जुमानलं नाही. अखेर कॅप्टन पीटरसनने बॉल आपल्या हातात घेतला आणि त्याच्या स्लो बॉलिंगवर गंभीर चकला. दुसर्‍या बाजूने युवराज सिंगनं मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत बॅटिंग करत आपली सेंच्युरी पूर्ण केली. यात त्याने दोन सिक्स आणि बारा फोर लगावले. युसुफ पठाणने निर्णायक क्षणी पन्नास रन्स केले. या तिघांचा अपवाद वगळता इतर भारतीय बॅट्समन मात्र फ्लॉप ठरले.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2008 07:45 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2008 07:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close