S M L

मिठागराच्या जमिनीसाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी !

27 सप्टेंबरमुंबई व उपनगरात झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केलं. मुंबई आणि उपनगरातील सुमारे 5 हजार एकर मिठागराच्या जमिनीचा ताबा मिळावा यासाठी राज्य सरकराने केंद्रसरकारकडे मागणी केली आहे. यातल्या बहुतेक जमिनीवर घरं बांधण्याची सरकारची योजना आहे. मिठागराच्या जमिनी मोकळ्या करा तसेच मुंबईच्या केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या जमिनी सुद्धा घरांच्या योजनांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारचा पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर हसावं की रडावं हेच कळत नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2011 11:18 AM IST

मिठागराच्या जमिनीसाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी !

27 सप्टेंबर

मुंबई व उपनगरात झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज स्पष्ट केलं. मुंबई आणि उपनगरातील सुमारे 5 हजार एकर मिठागराच्या जमिनीचा ताबा मिळावा यासाठी राज्य सरकराने केंद्रसरकारकडे मागणी केली आहे. यातल्या बहुतेक जमिनीवर घरं बांधण्याची सरकारची योजना आहे. मिठागराच्या जमिनी मोकळ्या करा तसेच मुंबईच्या केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या जमिनी सुद्धा घरांच्या योजनांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारचा पाठपुरावा सुरु आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर हसावं की रडावं हेच कळत नाही अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2011 11:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close