S M L

भीमा नदीच्या पात्रात महाकाय कासव मृतावस्थेत आढळले

28 सप्टेंबरदौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात सोनवडी इथं तब्बल 200 किलो वजनाचे महाकाय कासव मृतावस्थेत सापडलंय. या कासवाची लांबी 6 फूट 3 इंच आणि रूंदी 3 फूट 2 इंच आहे. हे कासव भीमा नदी जिथे उजनी जलाशयाला मिळते त्या सोनवडी भागात मिळाले आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या राजेंद्र केवटे व सहकारी यांना हे कासव सकाळी सापडलं. त्यांनी वनाधिकार्‍यांना ही माहिती दिली. त्यानंतर तत्काळ हे कासव रिक्षात घालून वनअधिकार्‍यांनी आपल्या ऑफिसला आणून त्याची तपासणी केली. हे कासव सॉफ्टशिल टर्टल या जातीतलं कासव असून त्याचं वय शंभर वर्षांपर्यंत असल्याचं सृष्टी जीव विश्वचे राम बुधकर यांनी सांगितलं. आणि आता हे मृत कासव मुंबईतल्या बोरवली इथल्या संजय गांधी उद्यानात पाठवण्यात येणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2011 06:28 PM IST

भीमा नदीच्या पात्रात महाकाय कासव मृतावस्थेत आढळले

28 सप्टेंबर

दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात सोनवडी इथं तब्बल 200 किलो वजनाचे महाकाय कासव मृतावस्थेत सापडलंय. या कासवाची लांबी 6 फूट 3 इंच आणि रूंदी 3 फूट 2 इंच आहे. हे कासव भीमा नदी जिथे उजनी जलाशयाला मिळते त्या सोनवडी भागात मिळाले आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या राजेंद्र केवटे व सहकारी यांना हे कासव सकाळी सापडलं. त्यांनी वनाधिकार्‍यांना ही माहिती दिली. त्यानंतर तत्काळ हे कासव रिक्षात घालून वनअधिकार्‍यांनी आपल्या ऑफिसला आणून त्याची तपासणी केली. हे कासव सॉफ्टशिल टर्टल या जातीतलं कासव असून त्याचं वय शंभर वर्षांपर्यंत असल्याचं सृष्टी जीव विश्वचे राम बुधकर यांनी सांगितलं. आणि आता हे मृत कासव मुंबईतल्या बोरवली इथल्या संजय गांधी उद्यानात पाठवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2011 06:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close