S M L

अमरावतीत तरुणीला 15 हजार रुपयांना विकले

28 सप्टेंबरपश्चिम बंगालमधील 20 वर्षीय तरूणीला अमरावतीत 15 हजार रुपयामध्ये विकण्याची धक्कादायक घटना उजेडात आली. अमरावतीत साईनगर भागातील एका फ्लॅटमध्ये या तरुणीला डांबून ठेवण्यात आलं होतं. या मुलीनं काल तिसर्‍या मजल्यावरुन साडी आणि चादरीच्या साह्याने पळ काढला. 2 दिवसांपुर्वी साईनगर भागातील संजीवनी अपार्टंमेटमध्ये नेहा खैरकर आणि अमित मत्तानी यांच्या घरी या तरुणीला तिच्या नवर्‍यानं आणून ठेवलं होतं. या अपार्टंमेटमध्ये वेश्याव्यवसाय चालतो. या युवतीचा पाठलाग करुन तिला परत आणण्याचा नेहा आणि अमितचा प्रयत्न फसला. सध्या बडनेरा पोलिसांनी या युवतीला आपल्या ताब्यात घेतलं असून तिच्या घरी पोहोचवून देण्यात आल्याचं म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2011 12:42 PM IST

अमरावतीत तरुणीला 15 हजार रुपयांना विकले

28 सप्टेंबर

पश्चिम बंगालमधील 20 वर्षीय तरूणीला अमरावतीत 15 हजार रुपयामध्ये विकण्याची धक्कादायक घटना उजेडात आली. अमरावतीत साईनगर भागातील एका फ्लॅटमध्ये या तरुणीला डांबून ठेवण्यात आलं होतं. या मुलीनं काल तिसर्‍या मजल्यावरुन साडी आणि चादरीच्या साह्याने पळ काढला. 2 दिवसांपुर्वी साईनगर भागातील संजीवनी अपार्टंमेटमध्ये नेहा खैरकर आणि अमित मत्तानी यांच्या घरी या तरुणीला तिच्या नवर्‍यानं आणून ठेवलं होतं. या अपार्टंमेटमध्ये वेश्याव्यवसाय चालतो. या युवतीचा पाठलाग करुन तिला परत आणण्याचा नेहा आणि अमितचा प्रयत्न फसला. सध्या बडनेरा पोलिसांनी या युवतीला आपल्या ताब्यात घेतलं असून तिच्या घरी पोहोचवून देण्यात आल्याचं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2011 12:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close