S M L

पश्चिम बंगालमध्ये मालगाडी घसरून भीषण पेट

28 सप्टेंबरपश्चिम बंगालमध्ये मालगाडी घसरून तिने पेट घेतला. पश्चिम बंगालच्या आलूवाडी आणि मांगूरजान रेल्वे स्टेशनांदरम्यान मालगाडीवरचे 5 टँकर्स अचानक पेटले. घर्षणामुळे आग लागली. आणि बघता बघता 5 पेट्रोल टँकर्स असे पेटले. आगीचे स्वरूप एवढं भीषण होतं, की रेल्वेचा एक रुळही पूर्ण तापून भट्टीतल्या पोलादासारखी लाल भडक झाला होता. तसेच जवळच्या साठलेल्या पाण्यात पेट्रोल पडलं. त्यामुळे या तलावातही आग लागल्याचे दृश्य होतं. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. पण अजूनही कोणताही अधिकारी घटनास्थळावर पोहोचला नव्हता. फायर ब्रिगेडचे जवानही पोहोचलेले नाहीत. आग अजूनही भडकत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2011 02:06 PM IST

पश्चिम बंगालमध्ये मालगाडी घसरून भीषण पेट

28 सप्टेंबर

पश्चिम बंगालमध्ये मालगाडी घसरून तिने पेट घेतला. पश्चिम बंगालच्या आलूवाडी आणि मांगूरजान रेल्वे स्टेशनांदरम्यान मालगाडीवरचे 5 टँकर्स अचानक पेटले. घर्षणामुळे आग लागली. आणि बघता बघता 5 पेट्रोल टँकर्स असे पेटले. आगीचे स्वरूप एवढं भीषण होतं, की रेल्वेचा एक रुळही पूर्ण तापून भट्टीतल्या पोलादासारखी लाल भडक झाला होता. तसेच जवळच्या साठलेल्या पाण्यात पेट्रोल पडलं. त्यामुळे या तलावातही आग लागल्याचे दृश्य होतं. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. पण अजूनही कोणताही अधिकारी घटनास्थळावर पोहोचला नव्हता. फायर ब्रिगेडचे जवानही पोहोचलेले नाहीत. आग अजूनही भडकत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2011 02:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close