S M L

टू जी घोटाळ्याप्रकरणी दयानिधी मारन अडचणीत

28 सप्टेंबर2 जी घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारनही अडचणी आले आहेत. एअरसेल-मॅक्सिस डील प्रकरणी मारन यांच्याविरोधात सीबीआय एफआयआर दाखल करणार आहे. त्यांच्यासोबतच त्यांचा भाऊ कलानिधी मारन आणि इतर पाच जणांचाही या एफआयआरमध्ये समावेश केला जाणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत एफआयआरबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवशंकरन यांच्या मालकीच्या एअरसेलला लायसन्स देण्यात मारन यांनी जाणूबुजून टाळाटाळ केली. आणि मॅक्सिस या कंपनीला झुकतं माप दिलं, असा त्यांच्यावर आरोप आहे. या डीलच्या बदल्यात मॅक्सिसने मारन कुटुंबीयांच्या मालकीच्या सन टीव्हीमध्ये गुंतवणूक केली. जवळपास 600 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने मॅक्सिसनं सन टीव्हीत गुंतवले. कटकारस्थान, पदाचा गैरवापर, लाचखोरी असे आरोप मारन यांच्यावर आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 28, 2011 04:52 PM IST

टू जी घोटाळ्याप्रकरणी दयानिधी मारन अडचणीत

28 सप्टेंबर

2 जी घोटाळ्याप्रकरणी माजी दूरसंचार मंत्री दयानिधी मारनही अडचणी आले आहेत. एअरसेल-मॅक्सिस डील प्रकरणी मारन यांच्याविरोधात सीबीआय एफआयआर दाखल करणार आहे. त्यांच्यासोबतच त्यांचा भाऊ कलानिधी मारन आणि इतर पाच जणांचाही या एफआयआरमध्ये समावेश केला जाणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत एफआयआरबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवशंकरन यांच्या मालकीच्या एअरसेलला लायसन्स देण्यात मारन यांनी जाणूबुजून टाळाटाळ केली. आणि मॅक्सिस या कंपनीला झुकतं माप दिलं, असा त्यांच्यावर आरोप आहे. या डीलच्या बदल्यात मॅक्सिसने मारन कुटुंबीयांच्या मालकीच्या सन टीव्हीमध्ये गुंतवणूक केली. जवळपास 600 कोटी रुपये टप्प्याटप्प्याने मॅक्सिसनं सन टीव्हीत गुंतवले. कटकारस्थान, पदाचा गैरवापर, लाचखोरी असे आरोप मारन यांच्यावर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 28, 2011 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close