S M L

पुण्यात 'एनडीए'कडे जाणार रस्ता बंद ; नागरिकांची गैरसोय

29 सप्टेंबरपुण्यातील चांदनी चौकातून एनडीएकडे जाणारा रस्ता सुरक्षेच्या कारणावरून बंद करण्यात आल्याने या रस्त्यावरचे हॉटेलचालक तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एनडीएने कोणतीही पूर्वसूचना न देता 23 सप्टंेबर पासून रस्ता बंद केला. एनडीएचे अधिकारी तसेच या रस्त्यावर ज्यांची घरं आहेत त्यांनाच फक्त जावू देण्यात येतंय. या रस्त्यावर गार्डन कोट, ओऍसिस आणि खानापिना अशी 3 हॉटेल्स आहेत या हॉटेल्सना मोठा फटका बसला आहे. तसेच या रस्त्यावर राहणार्‍यांकडे भेटायला जाणार्‍या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींनाही जाऊ दिलं जात नाही. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी आहे. तर सुरक्षेच्या कारणास्तवच एनडीए रोड बंद करत असल्याचे एनडीएने म्हंटलय. एका पत्राच्या माध्यमातून एनडीएने आपली बाजू स्पष्ट केली. एनडीए रस्त्यावर परवानगी नसतानाही अनेक हॉटेल्स उभी राहीली आहेत. या हॉटेल्समुळे या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे.ज्यामुळे एनडीएच्या सुरक्षेला धोका पोहोचु शकतो. एनडीएला जाण्यासाठी रस्ता बांधण्यासाठी ही जमीन ताब्यात घेण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात मात्र परवानगी नसतानाही इथे अनेक कमर्शीयल प्रॉपर्टीज उभ्या राहील्या आहेत. हे मुद्दे मांडण्यासाठी पुणे महापालिका आणि राज्य सरकार या दोघांशीही वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एनडीएने स्वतःच हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांच्या मदतीने एनडीए या रस्त्यावरुन जा ये करणार्‍या लोकांवर लक्ष ठेवेल. रस्ता बंद झाला असला तरी ज्यांची घरं या भागात आहेत त्यांना मात्र कोणतीही आडकाठी केली जाणार नाही असंही एनडीएने या पत्रामध्ये स्पष्ट केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2011 12:22 PM IST

पुण्यात 'एनडीए'कडे जाणार रस्ता बंद ; नागरिकांची गैरसोय

29 सप्टेंबर

पुण्यातील चांदनी चौकातून एनडीएकडे जाणारा रस्ता सुरक्षेच्या कारणावरून बंद करण्यात आल्याने या रस्त्यावरचे हॉटेलचालक तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. एनडीएने कोणतीही पूर्वसूचना न देता 23 सप्टंेबर पासून रस्ता बंद केला. एनडीएचे अधिकारी तसेच या रस्त्यावर ज्यांची घरं आहेत त्यांनाच फक्त जावू देण्यात येतंय.

या रस्त्यावर गार्डन कोट, ओऍसिस आणि खानापिना अशी 3 हॉटेल्स आहेत या हॉटेल्सना मोठा फटका बसला आहे. तसेच या रस्त्यावर राहणार्‍यांकडे भेटायला जाणार्‍या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींनाही जाऊ दिलं जात नाही. या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी आहे.

तर सुरक्षेच्या कारणास्तवच एनडीए रोड बंद करत असल्याचे एनडीएने म्हंटलय. एका पत्राच्या माध्यमातून एनडीएने आपली बाजू स्पष्ट केली. एनडीए रस्त्यावर परवानगी नसतानाही अनेक हॉटेल्स उभी राहीली आहेत. या हॉटेल्समुळे या रस्त्यावरची वर्दळ वाढली आहे.ज्यामुळे एनडीएच्या सुरक्षेला धोका पोहोचु शकतो. एनडीएला जाण्यासाठी रस्ता बांधण्यासाठी ही जमीन ताब्यात घेण्यात आली होती.

त्यानंतरच्या काळात मात्र परवानगी नसतानाही इथे अनेक कमर्शीयल प्रॉपर्टीज उभ्या राहील्या आहेत. हे मुद्दे मांडण्यासाठी पुणे महापालिका आणि राज्य सरकार या दोघांशीही वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे एनडीएने स्वतःच हा रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांच्या मदतीने एनडीए या रस्त्यावरुन जा ये करणार्‍या लोकांवर लक्ष ठेवेल. रस्ता बंद झाला असला तरी ज्यांची घरं या भागात आहेत त्यांना मात्र कोणतीही आडकाठी केली जाणार नाही असंही एनडीएने या पत्रामध्ये स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2011 12:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close