S M L

सत्ताधारी मेहेरबान तर कंत्राटदार 'पहिलवान' !

29 सप्टेंबरमुंबई महानगरपालिकेत सत्ताधार्‍यांनी पुन्हा एकदा, निकृष्ट काम करणार्‍या कॉन्ट्रॅक्टर्सनाचं 550 कोटींच कॉन्ट्रॅक्ट देवून घबाड मिळवून दिलं आहे. या विषयावर तब्बल साडेचार तास चर्चा झाली. काँग्रेसचे नगरसेवक राजहंससिंह, समीर देसाई आणि मनसेचे नगरसेवक मंगेश सांगळे यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला. मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा रंगली खरी, पण त्या चर्चेमध्ये विशेष गांभीर्य नव्हतं. एकमेकांशी शाब्दिक चकमकी करत ही चर्चा झाली. प्रस्ताव मंजुरीला आलेला असतांना मतं मोजण्यात आली नाहीत. सत्ताधारी मनमानी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. काँग्रेसनंही मोक्याच्या वेळी सभात्याग करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला साथ दिली. तर विरोध करतांना मंगेश सांगळेंनी, आयुक्त सुबोध कुमार यांना भैया म्हटलं. कमिशनर भैयेगिरी करतात असा आरोप केला. यावर ऍडशिनल कमिशनर असिम गुप्ता यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर मंगेश सांगळेंना आक्षेप मागे घ्यायला लावले. तर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी सभागृहात घुसून घोषणाबाजी करत स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला.मुंबई महानगर पालिकेनं नवीन रस्ते बनवण्याच्या कामासाठी साडेपाचशे कोटी रुपयाचे काँन्ट्रॅक्ट देण्याचं निश्चित केलं आहे. एकूण नऊ ठेकेदारांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार आहे. त्यापैकी दोन ठेकेदारांचे ग्रेड्स कमी करण्यात आले होते. तर एका कंपनीला काही दिवसांपूर्वी निकृष्ट कामामुळे ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं. असं असतानाही त्याच कंपन्यांना पुन्हा काँन्ट्रॅक्ट देण्याचा प्रताप मुंबई महानगर पालिका करू पाहतेय. मुंबईमध्ये 1900 किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी 725 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. यावर्षी 30.2 किमीचे सिमेंटचे रस्ते आणि 41.8 किमीचे अस्फाल्टचे रस्ते बनवण्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयाचे काँन्ट्रॅक्ट मुबंई महानगर पालिकेने काढलंय. एकूण 9 कॉन्ट्रॅक्टदारांना या कामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलंय.1) रेलकॉन कन्स्ट्रक्शनमालक-तेजस शहा2) महावीर ऍण्ड कंपनी मालक-जितेंद्र काकावत 3) प्रकाश इंजिनिअरींग4) बिटकॉन लिमिटेड5) आर के माधानी मालक- ग्यानखान माधानी6) वालेचा ऍन्ड कंपनी 7) आरपीएस लिमिटेडमालक- नितीन शहा 8) शांतीनाथ रोडवेज मालक- आशिष शहा 9) के. आर. कन्स्ट्रक्शन मालक- राजू त्रिवेदीया 9 कंपन्यांना 550 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे. त्यापैकी आर. के. मधानी आणि के. के. कन्सट्रक्शन कंपनीचे निकृष्ट कामामुळे रँकिंग कमी करण्यात आलं होतं. तर आर पी एस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. असं असूनही याच कंपन्यांना पुन्हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2011 01:54 PM IST

सत्ताधारी मेहेरबान तर कंत्राटदार 'पहिलवान' !

29 सप्टेंबर

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधार्‍यांनी पुन्हा एकदा, निकृष्ट काम करणार्‍या कॉन्ट्रॅक्टर्सनाचं 550 कोटींच कॉन्ट्रॅक्ट देवून घबाड मिळवून दिलं आहे. या विषयावर तब्बल साडेचार तास चर्चा झाली. काँग्रेसचे नगरसेवक राजहंससिंह, समीर देसाई आणि मनसेचे नगरसेवक मंगेश सांगळे यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला.

मुंबईकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर चर्चा रंगली खरी, पण त्या चर्चेमध्ये विशेष गांभीर्य नव्हतं. एकमेकांशी शाब्दिक चकमकी करत ही चर्चा झाली. प्रस्ताव मंजुरीला आलेला असतांना मतं मोजण्यात आली नाहीत. सत्ताधारी मनमानी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

काँग्रेसनंही मोक्याच्या वेळी सभात्याग करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेला साथ दिली. तर विरोध करतांना मंगेश सांगळेंनी, आयुक्त सुबोध कुमार यांना भैया म्हटलं. कमिशनर भैयेगिरी करतात असा आरोप केला. यावर ऍडशिनल कमिशनर असिम गुप्ता यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यानंतर मंगेश सांगळेंना आक्षेप मागे घ्यायला लावले. तर मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी सभागृहात घुसून घोषणाबाजी करत स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न केला.मुंबई महानगर पालिकेनं नवीन रस्ते बनवण्याच्या कामासाठी साडेपाचशे कोटी रुपयाचे काँन्ट्रॅक्ट देण्याचं निश्चित केलं आहे. एकूण नऊ ठेकेदारांना हे कॉन्ट्रॅक्ट देण्यात येणार आहे. त्यापैकी दोन ठेकेदारांचे ग्रेड्स कमी करण्यात आले होते. तर एका कंपनीला काही दिवसांपूर्वी निकृष्ट कामामुळे ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं होतं. असं असतानाही त्याच कंपन्यांना पुन्हा काँन्ट्रॅक्ट देण्याचा प्रताप मुंबई महानगर पालिका करू पाहतेय.

मुंबईमध्ये 1900 किलोमीटरचे रस्ते आहेत. यापैकी 725 किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. यावर्षी 30.2 किमीचे सिमेंटचे रस्ते आणि 41.8 किमीचे अस्फाल्टचे रस्ते बनवण्यासाठी साडेपाचशे कोटी रुपयाचे काँन्ट्रॅक्ट मुबंई महानगर पालिकेने काढलंय. एकूण 9 कॉन्ट्रॅक्टदारांना या कामाचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलंय.

1) रेलकॉन कन्स्ट्रक्शनमालक-तेजस शहा2) महावीर ऍण्ड कंपनी मालक-जितेंद्र काकावत 3) प्रकाश इंजिनिअरींग4) बिटकॉन लिमिटेड5) आर के माधानी मालक- ग्यानखान माधानी6) वालेचा ऍन्ड कंपनी 7) आरपीएस लिमिटेडमालक- नितीन शहा 8) शांतीनाथ रोडवेज मालक- आशिष शहा 9) के. आर. कन्स्ट्रक्शन मालक- राजू त्रिवेदीया 9 कंपन्यांना 550 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं आहे. त्यापैकी आर. के. मधानी आणि के. के. कन्सट्रक्शन कंपनीचे निकृष्ट कामामुळे रँकिंग कमी करण्यात आलं होतं. तर आर पी एस कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं. असं असूनही याच कंपन्यांना पुन्हा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2011 01:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close