S M L

इंदू मिलमधील 1 एकर जागा द्या शिवसेना नगरसेवकाची मागणी

29 सप्टेंबरडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा आरपीआयने मागितली असताना आता शिवसेनेच्या एका नगरसेवकानंही मिलमधील एक एकर जागा मागितली आहे. जगन्नाथ शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी इंदू मिलमधली जागा द्यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मनमोहन चोणकर यांनी केली. चोणकर हे वांद्रे-खेरवाडीचे नगरसेवक आहेत. त्यांनी महापालिकेला पाठवलेल्या पत्रावर उद्या सुधार समितीमध्ये चर्चा होणार आहे. एकीकडे शिवशक्ती -भीमशक्तीची निवडणूक एकत्र लढण्यावर चर्चा सुरू आहे. आणि आता आपल्याच पक्षाच्या या नगरसेवकाच्या मागणीवर आता सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2011 04:26 PM IST

इंदू मिलमधील 1 एकर जागा द्या शिवसेना नगरसेवकाची मागणी

29 सप्टेंबर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा आरपीआयने मागितली असताना आता शिवसेनेच्या एका नगरसेवकानंही मिलमधील एक एकर जागा मागितली आहे. जगन्नाथ शंकरशेठ यांच्या स्मारकासाठी इंदू मिलमधली जागा द्यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक मनमोहन चोणकर यांनी केली. चोणकर हे वांद्रे-खेरवाडीचे नगरसेवक आहेत. त्यांनी महापालिकेला पाठवलेल्या पत्रावर उद्या सुधार समितीमध्ये चर्चा होणार आहे. एकीकडे शिवशक्ती -भीमशक्तीची निवडणूक एकत्र लढण्यावर चर्चा सुरू आहे. आणि आता आपल्याच पक्षाच्या या नगरसेवकाच्या मागणीवर आता सत्ताधारी शिवसेना काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2011 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close