S M L

भाईंदरमध्ये बांधकामाची परात कोसळून 5 मजूरांचा मृत्यू

29 सप्टेंबरमुंबईत भाईंदर पूर्व येथे नव्यानं बाधून तयार झालेल्या इमारतीचं रंगकाम सुरु असतांना परात कोसळून झालेल्या अपघातात 5 मजूरांचा मृत्यू झाला. तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. भाईंदर पूर्व इथल्या 14 मजल्याच्या सिध्दिविनायक इमारतीत ही दुर्घटना झाली. मजूर रंगकाम करत होते, मात्र त्यासाठी उभारलेली परात अचानक कोसळली आणि मजूर खाली कोसळले. यापैकी 3 मजूरांचा मृत्यू घटनास्थळीच झाला तर 2 जण हॉस्पिटमध्ये दगावलेत. अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही नवगाव पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 29, 2011 04:32 PM IST

भाईंदरमध्ये बांधकामाची परात कोसळून 5 मजूरांचा मृत्यू

29 सप्टेंबर

मुंबईत भाईंदर पूर्व येथे नव्यानं बाधून तयार झालेल्या इमारतीचं रंगकाम सुरु असतांना परात कोसळून झालेल्या अपघातात 5 मजूरांचा मृत्यू झाला. तर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. भाईंदर पूर्व इथल्या 14 मजल्याच्या सिध्दिविनायक इमारतीत ही दुर्घटना झाली. मजूर रंगकाम करत होते, मात्र त्यासाठी उभारलेली परात अचानक कोसळली आणि मजूर खाली कोसळले. यापैकी 3 मजूरांचा मृत्यू घटनास्थळीच झाला तर 2 जण हॉस्पिटमध्ये दगावलेत. अजूनपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल झालेला नाही नवगाव पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 29, 2011 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close