S M L

गिरणी कामगारांचा आंदोलनाचा इशारा

02 ऑक्टोबरहक्काच्या घरासाठी विविध गिरणी कामगार संघटानांनी आज मुंबईत निदर्शनं केली. चर्चगेट जवळ आज सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन निदर्शनं केली. सरकार फक्त कामगारांना आश्वासनं देतं आहेत मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही अशी नाराजी कामगार संघटनांनी व्यक्त केली. सरकारने तातडीनं लक्षं न घातल्यास 17 तारखेपासून प्रदीर्घ आंदोलनाला सुरवात करणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला. दरम्यान शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला. दसरा मेळाव्यात शिवसेना आंदोलनाची रणनीती जाहीर करेल असंही त्यांनी सांगितलं.दरम्यान गिरणी कामगारांच्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांना आणखी एक आश्वासन दिलं. गटनेत्यासोबत होणार्‍या बैठकीनंतर या प्रश्नाबाबतचा पुढचा निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2011 11:25 PM IST

गिरणी कामगारांचा आंदोलनाचा इशारा

02 ऑक्टोबर

हक्काच्या घरासाठी विविध गिरणी कामगार संघटानांनी आज मुंबईत निदर्शनं केली. चर्चगेट जवळ आज सर्व कामगार संघटनांनी एकत्र येऊन निदर्शनं केली. सरकार फक्त कामगारांना आश्वासनं देतं आहेत मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही अशी नाराजी कामगार संघटनांनी व्यक्त केली. सरकारने तातडीनं लक्षं न घातल्यास 17 तारखेपासून प्रदीर्घ आंदोलनाला सुरवात करणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला. दरम्यान शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी कामगारांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा व्यक्त केला. दसरा मेळाव्यात शिवसेना आंदोलनाची रणनीती जाहीर करेल असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान गिरणी कामगारांच्या या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांना आणखी एक आश्वासन दिलं. गटनेत्यासोबत होणार्‍या बैठकीनंतर या प्रश्नाबाबतचा पुढचा निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2011 11:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close