S M L

92 वं अ.भा. नाट्य संमेलन सांगलीला

02 ऑक्टोबरआगामी 92 अखिल भारतीय नाट्य संमेलन सांगलीत 21 आणि 22 जानेवारीला होणार आहे. या नाटयसंमेलनाचे यजमानपद स्वीकारण्यासाठी सातारा,जळगाव,बारामती, नगर,नागपूर आणि पुणे इथल्या शाखांनी सुध्दा प्रस्ताव पाठवले होते. पण यामधून नाटयसंमेलनासाठी सांगलीची निवड झालेली आहे. मराठी रंगभूमीचं जन्मस्थान म्हणून परिचित आहे. विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली सांगलीतल्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये सीता स्वयंवर नाटक सादर केलं होतं. यामुळेच नाटयपंढरीत सांगलीतच नाटयसंमेलन होणार असल्याने नाटयरसिकांमधून आनंद व्यक्त होतोय. गेल्यावर्षी रत्नागिरीत झालेल्या नाटयसंमेलनाचे अध्यक्ष होते राम जाधव, आता सांगलीतील नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लवकरच अर्ज मागवले जाणार आहेत. यापूर्वी सांगलीत झालेल्या नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद दिवंगत प्रभाकर पणशीकर यांनी भूषवलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 2, 2011 12:00 AM IST

92 वं अ.भा. नाट्य संमेलन सांगलीला

02 ऑक्टोबर

आगामी 92 अखिल भारतीय नाट्य संमेलन सांगलीत 21 आणि 22 जानेवारीला होणार आहे. या नाटयसंमेलनाचे यजमानपद स्वीकारण्यासाठी सातारा,जळगाव,बारामती, नगर,नागपूर आणि पुणे इथल्या शाखांनी सुध्दा प्रस्ताव पाठवले होते. पण यामधून नाटयसंमेलनासाठी सांगलीची निवड झालेली आहे. मराठी रंगभूमीचं जन्मस्थान म्हणून परिचित आहे. विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली सांगलीतल्या राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये सीता स्वयंवर नाटक सादर केलं होतं. यामुळेच नाटयपंढरीत सांगलीतच नाटयसंमेलन होणार असल्याने नाटयरसिकांमधून आनंद व्यक्त होतोय. गेल्यावर्षी रत्नागिरीत झालेल्या नाटयसंमेलनाचे अध्यक्ष होते राम जाधव, आता सांगलीतील नाटयसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी लवकरच अर्ज मागवले जाणार आहेत. यापूर्वी सांगलीत झालेल्या नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद दिवंगत प्रभाकर पणशीकर यांनी भूषवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 2, 2011 12:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close