S M L

जुन्नरचा बाजार फुलांनी सजला

02 ऑक्टोबरनवरात्रामध्ये देवीच्या घटाला घातल्या जाणार्‍या फुलांमध्ये सर्वात जास्त मागणी असते, ती तिळाच्या फुलांना. पिवळयाधम्मक फुलांनी जुन्नर परिसर बहरून गेला आहे आणि या फुलांच्या तोडणी हंगामालाही सुरुवात झाली आहे. सौभाग्याचं लेणं म्हणून हळद आणि कुंकवाला खूप महत्व आहे आणि या रंगांच्या फुलांनाही देवीच्या पूजेत मान असतो. ग्रामीण भागात शेता-शेतामधून खास नवरात्रीसाठी या फुलांची लागवड केली जाते. सध्या ही फुले पिवळ्याधमक ताटव्यांनी बहरली आहेत. एरव्ही बाजारात या फुलांनी म्हणावी तशी मागणी नसते पण नवरात्रात स्त्रिया या फुलांनी खास देवीसाठी हार करुन घेतात. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात कोरडवाहू भागात शेताच्या बाजूने या फुलांचा सध्या बहर आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2011 09:41 PM IST

जुन्नरचा बाजार फुलांनी सजला

02 ऑक्टोबर

नवरात्रामध्ये देवीच्या घटाला घातल्या जाणार्‍या फुलांमध्ये सर्वात जास्त मागणी असते, ती तिळाच्या फुलांना. पिवळयाधम्मक फुलांनी जुन्नर परिसर बहरून गेला आहे आणि या फुलांच्या तोडणी हंगामालाही सुरुवात झाली आहे. सौभाग्याचं लेणं म्हणून हळद आणि कुंकवाला खूप महत्व आहे आणि या रंगांच्या फुलांनाही देवीच्या पूजेत मान असतो. ग्रामीण भागात शेता-शेतामधून खास नवरात्रीसाठी या फुलांची लागवड केली जाते. सध्या ही फुले पिवळ्याधमक ताटव्यांनी बहरली आहेत. एरव्ही बाजारात या फुलांनी म्हणावी तशी मागणी नसते पण नवरात्रात स्त्रिया या फुलांनी खास देवीसाठी हार करुन घेतात. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात कोरडवाहू भागात शेताच्या बाजूने या फुलांचा सध्या बहर आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2011 09:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close