S M L

कन्नड भाषा सक्ती विरोधात एकीकरण समितीचे आंदोलन

03 ऑक्टोबरबेळगाव जिल्ह्यामध्ये राहात असलेल्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून कन्नड भाषेची सक्ती केली जात आहे. त्याच्या निषेधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन पुकारले आहेत. इथल्या सरकारी कार्यालयातील कागदपत्रं मराठी भाषेत देण्याची गरज असतांना त्यांना कन्नड भाषेत उपलब्ध करुन दिली जात आहेत. मराठी भाषिकांची गेल्या अनेक वर्षांपासून पिळवणूक होत आहे. त्यामुळे आज समितीच्या वतीने बेळगाव-गोवा महामार्ग रास्ता रोको करण्यात आलं. आंदोलनात मोठ्या संख्येंने मराठी भाषिक सहभागी झाले आहेत. एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे. समितीच्या प्रमुख नेत्यांनाही अटक झाली. पण एकीकरण समितीचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. बेळगाव जवळ देसूर क्रॉस इथंही आंदोलन सुरू आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2011 09:53 AM IST

कन्नड भाषा सक्ती विरोधात एकीकरण समितीचे आंदोलन

03 ऑक्टोबर

बेळगाव जिल्ह्यामध्ये राहात असलेल्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून कन्नड भाषेची सक्ती केली जात आहे. त्याच्या निषेधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन पुकारले आहेत. इथल्या सरकारी कार्यालयातील कागदपत्रं मराठी भाषेत देण्याची गरज असतांना त्यांना कन्नड भाषेत उपलब्ध करुन दिली जात आहेत. मराठी भाषिकांची गेल्या अनेक वर्षांपासून पिळवणूक होत आहे. त्यामुळे आज समितीच्या वतीने बेळगाव-गोवा महामार्ग रास्ता रोको करण्यात आलं. आंदोलनात मोठ्या संख्येंने मराठी भाषिक सहभागी झाले आहेत. एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे. समितीच्या प्रमुख नेत्यांनाही अटक झाली. पण एकीकरण समितीचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. बेळगाव जवळ देसूर क्रॉस इथंही आंदोलन सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2011 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close