S M L

मुंबईत रिक्षांची दरवाढ ; दुसर्‍या टप्प्याला 50 पैसे ज्यादा !

04 सप्टेंबरमुंबईत अखेर रिक्षांमध्ये भाडेवाढ करण्यात आली आहे. आता दुसर्‍या टप्प्याला 50 पैसे ज्यादा द्यावे लागणार आहे. मात्रही दरवाढ 10 ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार आहे. मुंबईत झालेल्या काल रिक्षाचालकांच्या संपाचा चांगलाच फटका बसला. महिना 25 हजार रूपये उत्पन मिळावे इतकी भाडेवाढ करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं.आज रिक्षांच्या भाड्यात 50 पैशांची वाढ करण्यात आली आहेत. मुंबईत रिक्षांना पहिल्या एक किलोमीटरचं भाडं हे अकरा रुपयचे राहणार आहे. त्यानंतर मात्र प्रत्येक किलोमीटरमागे पन्नास पैशांची वाढ होणार आहे. ही भाडेवाढ येत्या 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यानुसार पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्याला 11 रुपये द्यावे लागतील. तर दुसर्‍या टप्पाला प्रवाशांना 6.50 रुपयांऐवजी सात रुपये द्यावे लागणार आहेत. यासंबंधीचा निर्णय एमएमआरटीए (MMRTA)च्या 29 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत झाला. त्यामुळे रिक्षाचालकांनी काल संप करुन मुंबईकरांना वेठीस धरणे योग्ये होते काय असा प्रश्न उपस्थित होतो. तर ठाणे शहर वगळता जिल्ह्याच्या इतर भागात म्हणजे नवी मुंबई, कल्याण, डोबिवली, भिवंडी, या भागात किमान भाडं आता 14 वरुन 15 रुपये करण्यात आलंय. ठाणे शहरातील रिक्षा सीएनजीवर सुरू असल्यानं शहरात दरवाढ लागू करण्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2011 12:06 PM IST

मुंबईत रिक्षांची दरवाढ ; दुसर्‍या टप्प्याला 50 पैसे ज्यादा !

04 सप्टेंबर

मुंबईत अखेर रिक्षांमध्ये भाडेवाढ करण्यात आली आहे. आता दुसर्‍या टप्प्याला 50 पैसे ज्यादा द्यावे लागणार आहे. मात्रही दरवाढ 10 ऑक्टोबरपासून दरवाढ लागू होणार आहे.

मुंबईत झालेल्या काल रिक्षाचालकांच्या संपाचा चांगलाच फटका बसला. महिना 25 हजार रूपये उत्पन मिळावे इतकी भाडेवाढ करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं.आज रिक्षांच्या भाड्यात 50 पैशांची वाढ करण्यात आली आहेत. मुंबईत रिक्षांना पहिल्या एक किलोमीटरचं भाडं हे अकरा रुपयचे राहणार आहे. त्यानंतर मात्र प्रत्येक किलोमीटरमागे पन्नास पैशांची वाढ होणार आहे. ही भाडेवाढ येत्या 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.

यानुसार पहिल्या एक किलोमीटरच्या टप्प्याला 11 रुपये द्यावे लागतील. तर दुसर्‍या टप्पाला प्रवाशांना 6.50 रुपयांऐवजी सात रुपये द्यावे लागणार आहेत. यासंबंधीचा निर्णय एमएमआरटीए (MMRTA)च्या 29 सप्टेंबरला झालेल्या बैठकीत झाला. त्यामुळे रिक्षाचालकांनी काल संप करुन मुंबईकरांना वेठीस धरणे योग्ये होते काय असा प्रश्न उपस्थित होतो. तर ठाणे शहर वगळता जिल्ह्याच्या इतर भागात म्हणजे नवी मुंबई, कल्याण, डोबिवली, भिवंडी, या भागात किमान भाडं आता 14 वरुन 15 रुपये करण्यात आलंय. ठाणे शहरातील रिक्षा सीएनजीवर सुरू असल्यानं शहरात दरवाढ लागू करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2011 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close