S M L

नाही तर रिक्षावाल्यांना 'खळ्ळ','फटाक'!

04 ऑक्टोबररिक्षाचालकांवर कारवाई झाली की संप करतात, अनधिकृत कागदपत्र आणि लायसन्स बाळगतात, मीटरमध्ये टँपरिंग केलं जातं, रिक्षावाले जवळची भाडी स्वीकारत नाहीत आणि प्रवाशांना मारहाण करतात रिक्षाचालकांनी ही मुजोरी थांबवला नाही तर उद्या मनसे "खळ्ळ',"फटाक' भाषेतच यांना समाजावे लागेल. तसेच रिक्षाचालक जेव्हा प्रवाशांना मारहाण करतात तेव्हा यांचे नेते शरद राव काहीच बोलत नाही त्यांना हे दिसत नाही जर रिक्षाचालकांची मुजोरी अशीच चालू राहीली तर राव यांना घराबाहेर निघू देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. यासाठी मनसे आपली ताकद दाखवून देईल असा सज्जड दमही भरला. राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेऊन मनसेची बाजू मांडली. मुंबईत काल झालेला एकदिवशीय रिक्षाचालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले. रिक्षाचालकांच्या संपावर मुंबईकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगार नेते शरद राव यांनी काल संध्याकाळी रिक्षाचालकांचा तूर्तास संप मागे घेत 09 नोव्हेंबरला पुन्हा संपावर जाण्याचा इशारा दिला. आज शरद राव यांच्या संपाचा समाचार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिक्षाचालकांना दम भरला. रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मिटर बसवावेच लागेल तसेच त्यांच्या मागण्य कायद्याला वाकवणार्‍या आहे. हे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलून योग्य ती कारवाई करावी. तसेच मुंबईत रिक्षाचालक, टॅक्सीवाले हे कशा प्रकारेअनधिकृत आहे यांचा पुरावाही राज यांनी पत्रकारांसमोर सादर केला. रिक्षाचालक परवाना मिळवण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला, मतदान पत्र, चार पासपोर्ट फोटो, मागील वर्षाची पॉलिसी इ. कागद पत्र सादर करून परवाना मिळवतात मात्र यासाठी दिलेल्या कागदपत्रावरील व्यक्तीही खोटी असल्याचं आढळून आलं आहे. यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी स्वत: जाऊन यांची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांवर झालेल्या कारवाईत 95 टक्के हे परप्रांतीय आहे असंही राज यांनी सांगितले. जर या संपात मराठी बांधव असतील तर त्यांनी राव यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये असं आवाहनही राज यांनी दिलं. काही दिवसांपूर्वी विक्रोळी, कन्नमवारनगर येथे रिक्षाचालकांनी प्रवाशांना लोखंडी सळईने मारहाण केली होती. त्या प्रवाश्यांनाही राज यांनी पत्रकारपरिषदेत बोलावले होते. जर रिक्षाचालकांनी कायदा हाती घेतला तर लोकांना आणि मनसे कार्यकर्त्यांनाही कायदा हातात घ्यावा लागेल असंही राज यांनी स्पष्ट केलं. मात्र रिक्षाचालकांच्या या मुजोरी कारभारावर त्यांचे नेते शरद राव काहीच बोलत नाहीत. रिक्षाचालकांची मुजोरी अशीच चालू राहिली तर राव यांना घराबाहेर निघू देणार नाही असा इशाराही राज यांनी दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2011 01:14 PM IST

नाही तर रिक्षावाल्यांना 'खळ्ळ','फटाक'!

04 ऑक्टोबर

रिक्षाचालकांवर कारवाई झाली की संप करतात, अनधिकृत कागदपत्र आणि लायसन्स बाळगतात, मीटरमध्ये टँपरिंग केलं जातं, रिक्षावाले जवळची भाडी स्वीकारत नाहीत आणि प्रवाशांना मारहाण करतात रिक्षाचालकांनी ही मुजोरी थांबवला नाही तर उद्या मनसे "खळ्ळ',"फटाक' भाषेतच यांना समाजावे लागेल. तसेच रिक्षाचालक जेव्हा प्रवाशांना मारहाण करतात तेव्हा यांचे नेते शरद राव काहीच बोलत नाही त्यांना हे दिसत नाही जर रिक्षाचालकांची मुजोरी अशीच चालू राहीली तर राव यांना घराबाहेर निघू देणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. यासाठी मनसे आपली ताकद दाखवून देईल असा सज्जड दमही भरला. राज यांनी आपल्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे पत्रकार परिषद घेऊन मनसेची बाजू मांडली.

मुंबईत काल झालेला एकदिवशीय रिक्षाचालकांच्या संपामुळे मुंबईकरांचे पुरते हाल झाले. रिक्षाचालकांच्या संपावर मुंबईकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कामगार नेते शरद राव यांनी काल संध्याकाळी रिक्षाचालकांचा तूर्तास संप मागे घेत 09 नोव्हेंबरला पुन्हा संपावर जाण्याचा इशारा दिला. आज शरद राव यांच्या संपाचा समाचार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रिक्षाचालकांना दम भरला. रिक्षांना इलेक्ट्रॉनिक मिटर बसवावेच लागेल तसेच त्यांच्या मागण्य कायद्याला वाकवणार्‍या आहे. हे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. यासाठी सरकारने योग्य पाऊल उचलून योग्य ती कारवाई करावी.

तसेच मुंबईत रिक्षाचालक, टॅक्सीवाले हे कशा प्रकारेअनधिकृत आहे यांचा पुरावाही राज यांनी पत्रकारांसमोर सादर केला. रिक्षाचालक परवाना मिळवण्यासाठी शाळा सोडण्याचा दाखला, मतदान पत्र, चार पासपोर्ट फोटो, मागील वर्षाची पॉलिसी इ. कागद पत्र सादर करून परवाना मिळवतात मात्र यासाठी दिलेल्या कागदपत्रावरील व्यक्तीही खोटी असल्याचं आढळून आलं आहे. यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी स्वत: जाऊन यांची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकांवर झालेल्या कारवाईत 95 टक्के हे परप्रांतीय आहे असंही राज यांनी सांगितले. जर या संपात मराठी बांधव असतील तर त्यांनी राव यांच्या आंदोलनात सहभागी होऊ नये असं आवाहनही राज यांनी दिलं.

काही दिवसांपूर्वी विक्रोळी, कन्नमवारनगर येथे रिक्षाचालकांनी प्रवाशांना लोखंडी सळईने मारहाण केली होती. त्या प्रवाश्यांनाही राज यांनी पत्रकारपरिषदेत बोलावले होते. जर रिक्षाचालकांनी कायदा हाती घेतला तर लोकांना आणि मनसे कार्यकर्त्यांनाही कायदा हातात घ्यावा लागेल असंही राज यांनी स्पष्ट केलं. मात्र रिक्षाचालकांच्या या मुजोरी कारभारावर त्यांचे नेते शरद राव काहीच बोलत नाहीत. रिक्षाचालकांची मुजोरी अशीच चालू राहिली तर राव यांना घराबाहेर निघू देणार नाही असा इशाराही राज यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2011 01:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close