S M L

अण्णा इम्पॅक्ट : टोलनाक्यांवर आता इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड !

05 ऑक्टोबरजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या टोल पॉलिसीच्या इशार्‍यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले. टोल नाक्याच्या तक्रारीनंतर करावयाच्या उपाययोजनांचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने मंगळवारी अण्णा हजारे यांच्यासमोर प्रेझेन्टेशन करण्यात आले. त्यानंतर आज येत्या 26 जानेवारीपर्यंत राज्यातल्या सर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक टोल डिसप्ले बोर्ड लावण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. याच महिन्यात प्रायोगिक तत्वावर अहमदनगर ते औरंगाबाद रस्त्यावरील तीन टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक टोल डिसप्ले बोर्ड लावण्यात येणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. काल राळेगणसिध्दीत अण्णांची पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. याबैठकीनंतर अण्णांनी जर महिन्याभरात राज्यात टोलवसूलीसाठी नवी पॉलिसी आली नाही तर आपण आंदोलन करू असा इशारा दिला.जर टोलवसूलीसाठी इलेक्ट्रानिक मशिन बसवलं तर राज्यातील 25 ते 30 टोल नाके कायमस्वरूपी बंद होईल असंही अण्णा म्हणाले. अण्णांच्या या इशार्‍यानंतर सार्वजनिक खात्याच्या वतीने आता येत्या 26 जानेवारीपर्यंत राज्यातल्या सर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक टोल डिसप्ले बोर्ड लावण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 04:30 PM IST

अण्णा इम्पॅक्ट : टोलनाक्यांवर आता इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड !

05 ऑक्टोबर

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या टोल पॉलिसीच्या इशार्‍यानंतर सार्वजनिक बांधकाम खाते खडबडून जागे झाले. टोल नाक्याच्या तक्रारीनंतर करावयाच्या उपाययोजनांचे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने मंगळवारी अण्णा हजारे यांच्यासमोर प्रेझेन्टेशन करण्यात आले. त्यानंतर आज येत्या 26 जानेवारीपर्यंत राज्यातल्या सर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक टोल डिसप्ले बोर्ड लावण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. याच महिन्यात प्रायोगिक तत्वावर अहमदनगर ते औरंगाबाद रस्त्यावरील तीन टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक टोल डिसप्ले बोर्ड लावण्यात येणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

काल राळेगणसिध्दीत अण्णांची पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांसोबत बैठक झाली. याबैठकीनंतर अण्णांनी जर महिन्याभरात राज्यात टोलवसूलीसाठी नवी पॉलिसी आली नाही तर आपण आंदोलन करू असा इशारा दिला.जर टोलवसूलीसाठी इलेक्ट्रानिक मशिन बसवलं तर राज्यातील 25 ते 30 टोल नाके कायमस्वरूपी बंद होईल असंही अण्णा म्हणाले. अण्णांच्या या इशार्‍यानंतर सार्वजनिक खात्याच्या वतीने आता येत्या 26 जानेवारीपर्यंत राज्यातल्या सर्व टोल नाक्यावर इलेक्ट्रॉनिक टोल डिसप्ले बोर्ड लावण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close