S M L

"भैरोबाच्या नावानं चांगभलं'

05 ऑक्टोबरग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रथा परंपरेनुसार आजचा नवरात्रोत्सवचा नववा दिवस साजरा केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वरणगेमध्ये गावातल्या भैरवनाथ मंदिरात 9 दिवस उपवासाला बसणारे सगळेच वेगळ्या पद्धतीनं उपवास सोडतात. सुरवातीला भैरवनाथ मंदिरात आरती होते. त्यानंतर भैरवनाथाची पालखी बाहेर पडते. पालखीच्या पुढं मानाच्या 7 सासनकाठ्या असतात. उपवास धरणार्‍या सगळ्या महिला पालखीच्या पाठीमागे असतात. गावापासून एक किलोमिटरवर असणार्‍या पंचगंगा नदिकडे हे सगळे निघतात. जशी नदीजवळ येईल तसं सुरवातीला सासनकाठ्या घेतलेले तरुण पळत जाऊन नदीत सासनकाठ्या बुडवतात. त्यांच्यापाठीमागे पालखी घेतलेले गुरव पळत येतात. आणि त्यांच्यापाठीमागे 9 दिवस उपवास करणारे सगळे पळत येऊन नदीच्या कडेला थांबतात. तिथं त्यांच्यावर नदीत पोहत असणारे तरुण नदीतील पाणी शिंपडतात. त्यानंतर पुन्हा हे सगळे धावत मंदिराकडे निघतात. त्यानंतर हा धार्मिक विधी पार पडतो आणि सगळे उपवास सोडतात. गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा गावात जपली जातेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 12:57 PM IST

"भैरोबाच्या नावानं चांगभलं'

05 ऑक्टोबर

ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रथा परंपरेनुसार आजचा नवरात्रोत्सवचा नववा दिवस साजरा केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातल्या वरणगेमध्ये गावातल्या भैरवनाथ मंदिरात 9 दिवस उपवासाला बसणारे सगळेच वेगळ्या पद्धतीनं उपवास सोडतात. सुरवातीला भैरवनाथ मंदिरात आरती होते. त्यानंतर भैरवनाथाची पालखी बाहेर पडते. पालखीच्या पुढं मानाच्या 7 सासनकाठ्या असतात. उपवास धरणार्‍या सगळ्या महिला पालखीच्या पाठीमागे असतात. गावापासून एक किलोमिटरवर असणार्‍या पंचगंगा नदिकडे हे सगळे निघतात. जशी नदीजवळ येईल तसं सुरवातीला सासनकाठ्या घेतलेले तरुण पळत जाऊन नदीत सासनकाठ्या बुडवतात. त्यांच्यापाठीमागे पालखी घेतलेले गुरव पळत येतात. आणि त्यांच्यापाठीमागे 9 दिवस उपवास करणारे सगळे पळत येऊन नदीच्या कडेला थांबतात. तिथं त्यांच्यावर नदीत पोहत असणारे तरुण नदीतील पाणी शिंपडतात. त्यानंतर पुन्हा हे सगळे धावत मंदिराकडे निघतात. त्यानंतर हा धार्मिक विधी पार पडतो आणि सगळे उपवास सोडतात. गेल्या शंभर वर्षांपासून ही परंपरा गावात जपली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 12:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close