S M L

अखेर गिरणी कामगारांच्या वारसांनाही मिळणार घरं !

04 ऑक्टोबरगिरणी कामगारांबरोबरच जे गिरणी कामगार हयात नाहीत, त्यांच्या वारसांना सुद्धा घरं मिळणार आहेत. वारसांच्या नोंदणी प्रक्रिया राबवायचे सरकारने ठरवलं आहेत. नोंदणी अर्ज जारी करण्यासंबंधीच्या फाईलवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सही केली. गेली काही महिने ही फाईल धूळ खात पडली होती. मुंबईत 1 लाख 10 हजार गिरणी कामगारांची संख्या आधीच निश्चित झाली. पण वारसाहक्काची नेमकी घरं किती द्यायची हे मात्र स्पष्ट नव्हतं. ते आता स्पष्ट होणार आहे. दरम्यान आज गिरणी कामगारांच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांनी गटनेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. खरंतर ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. पण याबैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. असं करून त्यांनी पुन्हा एकदा गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाला हरताळ फासलाय असा आरो़प गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 4, 2011 06:21 PM IST

अखेर गिरणी कामगारांच्या वारसांनाही मिळणार घरं !

04 ऑक्टोबर

गिरणी कामगारांबरोबरच जे गिरणी कामगार हयात नाहीत, त्यांच्या वारसांना सुद्धा घरं मिळणार आहेत. वारसांच्या नोंदणी प्रक्रिया राबवायचे सरकारने ठरवलं आहेत. नोंदणी अर्ज जारी करण्यासंबंधीच्या फाईलवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सही केली. गेली काही महिने ही फाईल धूळ खात पडली होती. मुंबईत 1 लाख 10 हजार गिरणी कामगारांची संख्या आधीच निश्चित झाली. पण वारसाहक्काची नेमकी घरं किती द्यायची हे मात्र स्पष्ट नव्हतं. ते आता स्पष्ट होणार आहे. दरम्यान आज गिरणी कामगारांच्या प्रश्नासंबंधी मुख्यमंत्र्यांनी गटनेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. खरंतर ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार होती. पण याबैठकीला मुख्यमंत्री अनुपस्थित राहिले. असं करून त्यांनी पुन्हा एकदा गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाला हरताळ फासलाय असा आरो़प गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 4, 2011 06:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close