S M L

मीरा-भाईंदरमध्ये सर्वात मोठा जुगार अड्डा उद्धवस्त

05 ऑक्टोबरमुंबईतील मिरा-भाईंदरमधील काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मी लॉज इथं सुरु असलेला सर्वात मोठा जुगार अड्डा पोलिसांनी छापा मारुन उद्धस्त केला. या छाप्यात सुमारे 2 लाख रुपये रोख आणि जुगार खेळणार्‍या 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. यात 4 महिलांचा समावेश आहे. सगळयात महत्त्वाचं म्हणजे, मीरा भाईंदर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रुपेश रेडकर तसेच राष्ट्रवादीचीच युवा महिला जिल्हाध्यक्ष आशा पाटील यांना अटक केली आहे. या अड्‌ड्यात पकडलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी. एकिकडे गृहमंत्री आर आर पाटील अवैध धंदे उध्वस्त करीत असतांना त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी अवैध धंदे करीत असल्याचं उघड झालं आहे. काही वर्षांपुर्वी इंटरनेटवरुन मैत्री केलेल्या पाकिस्तानी युवकाशी पाकिस्तानातच जाऊन लग्न केल्यामुळे आशा पाटील चर्चेत आली होती. पतीच्या निधनानंतर मुलासह आशा पाटील पुन्हा भारतात आली. मीरा रोड इथं स्थायिक झालेल्या आशा पाटील ही सध्या राष्ट्रवादी युवक महिला जिल्हाध्यक्ष आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 09:57 AM IST

मीरा-भाईंदरमध्ये सर्वात मोठा जुगार अड्डा उद्धवस्त

05 ऑक्टोबर

मुंबईतील मिरा-भाईंदरमधील काशीमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मी लॉज इथं सुरु असलेला सर्वात मोठा जुगार अड्डा पोलिसांनी छापा मारुन उद्धस्त केला. या छाप्यात सुमारे 2 लाख रुपये रोख आणि जुगार खेळणार्‍या 50 जणांना ताब्यात घेतलं आहे. यात 4 महिलांचा समावेश आहे. सगळयात महत्त्वाचं म्हणजे, मीरा भाईंदर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष रुपेश रेडकर तसेच राष्ट्रवादीचीच युवा महिला जिल्हाध्यक्ष आशा पाटील यांना अटक केली आहे. या अड्‌ड्यात पकडलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी. एकिकडे गृहमंत्री आर आर पाटील अवैध धंदे उध्वस्त करीत असतांना त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी अवैध धंदे करीत असल्याचं उघड झालं आहे. काही वर्षांपुर्वी इंटरनेटवरुन मैत्री केलेल्या पाकिस्तानी युवकाशी पाकिस्तानातच जाऊन लग्न केल्यामुळे आशा पाटील चर्चेत आली होती. पतीच्या निधनानंतर मुलासह आशा पाटील पुन्हा भारतात आली. मीरा रोड इथं स्थायिक झालेल्या आशा पाटील ही सध्या राष्ट्रवादी युवक महिला जिल्हाध्यक्ष आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 09:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close