S M L

भारताने दुसरी वनडे 54 रन्सनी जिंकली

17 नोव्हेंबर इंदूरभारताने इंग्लंड विरुद्धची दुसरी वनडे 54 रन्सनी जिंकली. इंग्लंडचे सर्व बॅट्समन 238 धावावर आऊट झाले. इंदूर इथल्या दुस-या वन डेत भारताने इंग्लंड समोर विजयासाठी 293 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. या टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंडने सावध सुरुवात केली होती. परंतु इंग्लडची मधली फळी ढेपाळली. मॅचमध्ये युवराज सिंगची सेंच्युरी आणि शेवटच्या क्षणी युसुफ पठाणने केलेली फटकेबाज हाफ सेंच्युरी हे भारतीय इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. चौथ्या विकेटसाठी युवराज सिंग आणि गौतम गंभीरनं 134 रन्सची दणदणीत पार्टनरशिप केली. गौतम गंभीरने करिअरमधली तेरावी हाफ सेंच्युरी करताना 70 रन्स केले. दुस-या बाजूने युवराज सिंगनं मात्र आपल्या नेहमीच्या शैलीत बॅटिंग करत आपली सेंच्युरी पूर्ण केली. युवराजने 118 केले. यात त्याने दोन सिक्स आणि बारा फोर लगावले. युसुफ पठाणने निर्णायक क्षणी पन्नास रन्स केले. या तिघांचा अपवाद वगळता इतर भारतीय बॅट्समन मात्र फ्लॉप ठरले.इंग्लंडतर्फे कॅप्टन पीटरसन 33, फ्लिंटॉप 43 तर शहाने सर्वात जास्त 54 रन्स केले. भारताकडून युवराज सिंगने 4 विकेटस घेतल्या. युवराजसिंगला मॅन ऑफ द मॅच देण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2008 10:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2008 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close