S M L

ठाण्यात 3 वर्षात 377 कुपोषित बालकांचा मृत्यू

05 ऑक्टोबरआदिवासी मुलांच्या कुपोषणाचा मुद्दा अजूनही कायम आहे. ठाणे जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातीलं कुपोषण कमी करण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, पण कुपोषणाची परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या 3 वर्षात मोखाड्यात 377 बालकांचा मृत्यू झाले. याला इथल्या प्रशासनाचा भोंगळ कारभारच जास्त जबाबदार आहेत. बाल विकास केंद्रं चालवली जातात पण ती केंद्रच आजारी पडलीत. कुठे अंगणवाड्यांची दुरवस्था आहे तर कुठे वजनकाटे बिघडले आहेत. या केंद्रांना पोषक आहार पुरवणार्‍या बचत गटांची बिलंसुद्धा गेल्या 7 महिन्यांपासून मिळालेली नाहीत.तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावातमुलांची वजनं पुन्हा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. कुपोषित मुलांसाठी खास बाल विकास केंद्र चालवली जाताहेत या केंद्रांमध्ये असेपर्यंत कुपोषित मुलांची प्रकृती सुधारलेली आढळते. या मुलांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केले जातात, पौष्टीक पदार्थांचे टेक होम रेशन दिलं जातं. पण केंद्रातून परतल्यावर पुन्हा त्यांची वजनं कमी होत असल्याचे दिसतंय. त्र्यंबक तालुक्यातल्या चिंचवड, नाकेपाडा, जातेगाव, खळवळ या गावात अशा प्रकारे वजन कमी होणार्‍या बालकांची संख्या मोठी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 01:45 PM IST

ठाण्यात 3 वर्षात 377 कुपोषित बालकांचा मृत्यू

05 ऑक्टोबर

आदिवासी मुलांच्या कुपोषणाचा मुद्दा अजूनही कायम आहे. ठाणे जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातीलं कुपोषण कमी करण्यासाठी गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, पण कुपोषणाची परिस्थिती जैसे थे आहे. गेल्या 3 वर्षात मोखाड्यात 377 बालकांचा मृत्यू झाले. याला इथल्या प्रशासनाचा भोंगळ कारभारच जास्त जबाबदार आहेत. बाल विकास केंद्रं चालवली जातात पण ती केंद्रच आजारी पडलीत. कुठे अंगणवाड्यांची दुरवस्था आहे तर कुठे वजनकाटे बिघडले आहेत. या केंद्रांना पोषक आहार पुरवणार्‍या बचत गटांची बिलंसुद्धा गेल्या 7 महिन्यांपासून मिळालेली नाहीत.

तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातल्या अनेक गावातमुलांची वजनं पुन्हा कमी होत असल्याच्या तक्रारी आहेत. कुपोषित मुलांसाठी खास बाल विकास केंद्र चालवली जाताहेत या केंद्रांमध्ये असेपर्यंत कुपोषित मुलांची प्रकृती सुधारलेली आढळते. या मुलांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचार केले जातात, पौष्टीक पदार्थांचे टेक होम रेशन दिलं जातं. पण केंद्रातून परतल्यावर पुन्हा त्यांची वजनं कमी होत असल्याचे दिसतंय. त्र्यंबक तालुक्यातल्या चिंचवड, नाकेपाडा, जातेगाव, खळवळ या गावात अशा प्रकारे वजन कमी होणार्‍या बालकांची संख्या मोठी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close