S M L

बॉक्स ऑफिसवर 'फोर्स' हिट

05 ऑक्टोबरमागिल आठवड्यात पाच सिनेमे रिलीज झाले. पण सगळ्यांचं लक्ष होतं ते जॉन इब्राहिमच्या फोर्सकडे. झूठा ही सही, आशियाँ, 7 खून माफ. जॉनचे एकापोठोपाठ एक सिनेमे फ्लॉप होत गेले. जॉनला एका हिटची गरज होतीच. आणि निशिकांत कामतच्या फोर्सनं त्याला यश मिळवून दिलं. काखा काखा या तामीळ हिट सिनेमाचा हा रिमेक आहे. आणि सिनेमाचं ओपनिंग झालंय 50 ते 60 टक्के.बॉक्स ऑफिस रिपोर्टसिनेमा - फोर्सओपनिंग - 50-60 %फोर्सने शुक्रवारी पाच कोटींचा बिझनेस केला. आणि विकेण्डला सव्वा पंधरा कोटींची मजल मारली गेली. फोर्सचे बजेट आहे 33 कोटींचे. पण समीक्षक सिनेमावर फारसे खूश नाहीत. फोर्स पाठोपाठ साहिब,बिबी और गँगस्टरचे ओपनिंग झालं 20 ते 25 टक्के. जिमी शेरगील, रणदीप हूडा आणि माही गिल यांचा अभिनय असलेल्या सिनेमाकडून फार अपेक्षा नव्हत्या.बॉक्स ऑफिस रिपोर्टसिनेमा - साहिब, बिबी और गँगस्टरओपनिंग - 20-25%हम तुम और शबाना, तेरे मेरे फेरे , चार्जशिट कधी आले आणि कधी गेले ते कळलंच नाही.आता लक्ष आहे ते रास्कल्स, साऊंडट्रॅक आणि लव्ह ब्रेकअप्स जिंदगीवर.. पुढच्या आठवड्यात या तीन सिनेमांची ट्रीट आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 5, 2011 06:01 PM IST

बॉक्स ऑफिसवर 'फोर्स' हिट

05 ऑक्टोबर

मागिल आठवड्यात पाच सिनेमे रिलीज झाले. पण सगळ्यांचं लक्ष होतं ते जॉन इब्राहिमच्या फोर्सकडे. झूठा ही सही, आशियाँ, 7 खून माफ. जॉनचे एकापोठोपाठ एक सिनेमे फ्लॉप होत गेले. जॉनला एका हिटची गरज होतीच. आणि निशिकांत कामतच्या फोर्सनं त्याला यश मिळवून दिलं. काखा काखा या तामीळ हिट सिनेमाचा हा रिमेक आहे. आणि सिनेमाचं ओपनिंग झालंय 50 ते 60 टक्के.

बॉक्स ऑफिस रिपोर्टसिनेमा - फोर्सओपनिंग - 50-60 %

फोर्सने शुक्रवारी पाच कोटींचा बिझनेस केला. आणि विकेण्डला सव्वा पंधरा कोटींची मजल मारली गेली. फोर्सचे बजेट आहे 33 कोटींचे. पण समीक्षक सिनेमावर फारसे खूश नाहीत. फोर्स पाठोपाठ साहिब,बिबी और गँगस्टरचे ओपनिंग झालं 20 ते 25 टक्के. जिमी शेरगील, रणदीप हूडा आणि माही गिल यांचा अभिनय असलेल्या सिनेमाकडून फार अपेक्षा नव्हत्या.

बॉक्स ऑफिस रिपोर्टसिनेमा - साहिब, बिबी और गँगस्टरओपनिंग - 20-25%

हम तुम और शबाना, तेरे मेरे फेरे , चार्जशिट कधी आले आणि कधी गेले ते कळलंच नाही.आता लक्ष आहे ते रास्कल्स, साऊंडट्रॅक आणि लव्ह ब्रेकअप्स जिंदगीवर.. पुढच्या आठवड्यात या तीन सिनेमांची ट्रीट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 5, 2011 06:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close