S M L

बिना डब्याच्या गाडीत आम्ही चढत नाही - उद्धव ठाकरे

07 ऑक्टोबरआम्ही बिना डब्याच्या गाडीत चढत नाही, लोकांना फुकट सल्ले द्याचे असेल तर असू द्या फुकटचे सल्ले देण्यास बंधन नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. कालच्या झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनीही रिक्षाचालकांना धडा शिवसैनिकांनीच शिकवला असा दावा केला आहे. आणि आज उध्दव ठाकरेंनी राज यांना प्रतिउत्तर दिलं. रिक्षा आंदोलनाच्या मुद्यावरून मनसे आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेलंं राजकारण थांबत नाही. तुमची गाडी चुकली. उगात त्यात बसण्याचा प्रयत्न करु नका अशी टोला राज ठाकरेंनी लगावला होता. तसेच मुजोर रिक्षाचालकांना काल मिळालेला धडा हा लोकांच्या उद्रेकातून आहे उगाच याचं श्रेय लाटण्यासाठी इतरांनी प्रयत्न करू नये आंदोलनाची गाडी सुटली आहे इतरांनी यात चढण्याचा प्रयत्न करू नये उगाच गाडी चढून गाडीत असल्याच आव आणणे हा त्यांच्या स्वत: च्या समाधानासाठी आहे लोकांना माहित आहे हे आंदोलन कोणामुळे झालं असा टोला राज ठाकरे यांनी शिवसेनाला लगावला होता. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने चौफेर तोफ डागली. माझ्या शिवसैनिकांनीच रिक्षा चालकांना अद्दल घडवली आहे. प्रवाशांना त्रास दिला तर शिवसैनिक नेहमी उत्तर देतील असा इशाराही दिला होता. राज ठाकरेंच्या टीकेला उध्दव ठाकरेंनी टपली मारली. आम्ही बिना डब्याच्या गाडीत चढत नाही, लोकांना फुकट सल्ले द्याचे असेल तर असु द्या फुकटचे सल्ले देण्यास बंधन नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2011 12:01 PM IST

बिना डब्याच्या गाडीत आम्ही चढत नाही - उद्धव ठाकरे

07 ऑक्टोबर

आम्ही बिना डब्याच्या गाडीत चढत नाही, लोकांना फुकट सल्ले द्याचे असेल तर असू द्या फुकटचे सल्ले देण्यास बंधन नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. कालच्या झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांनीही रिक्षाचालकांना धडा शिवसैनिकांनीच शिकवला असा दावा केला आहे. आणि आज उध्दव ठाकरेंनी राज यांना प्रतिउत्तर दिलं.

रिक्षा आंदोलनाच्या मुद्यावरून मनसे आणि शिवसेना यांच्यात सुरु असलेलंं राजकारण थांबत नाही. तुमची गाडी चुकली. उगात त्यात बसण्याचा प्रयत्न करु नका अशी टोला राज ठाकरेंनी लगावला होता. तसेच मुजोर रिक्षाचालकांना काल मिळालेला धडा हा लोकांच्या उद्रेकातून आहे उगाच याचं श्रेय लाटण्यासाठी इतरांनी प्रयत्न करू नये आंदोलनाची गाडी सुटली आहे इतरांनी यात चढण्याचा प्रयत्न करू नये उगाच गाडी चढून गाडीत असल्याच आव आणणे हा त्यांच्या स्वत: च्या समाधानासाठी आहे लोकांना माहित आहे हे आंदोलन कोणामुळे झालं असा टोला राज ठाकरे यांनी शिवसेनाला लगावला होता. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने चौफेर तोफ डागली. माझ्या शिवसैनिकांनीच रिक्षा चालकांना अद्दल घडवली आहे. प्रवाशांना त्रास दिला तर शिवसैनिक नेहमी उत्तर देतील असा इशाराही दिला होता. राज ठाकरेंच्या टीकेला उध्दव ठाकरेंनी टपली मारली. आम्ही बिना डब्याच्या गाडीत चढत नाही, लोकांना फुकट सल्ले द्याचे असेल तर असु द्या फुकटचे सल्ले देण्यास बंधन नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2011 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close