S M L

नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रीपदाला 10 वर्ष पूर्ण

07 ऑक्टोबरनरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचे एक दशक पूर्ण केलंय. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांची अटक हा मोदी यांच्या कार्यकाळातला एक वादग्रस्त निर्णय आहे. गेल्या दहा वर्षांत असे अनेक वादग्रस्त निर्णय त्यांनी घेतले आहेत. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश हे त्यांचं गेल्या दहा वर्षातील स्वप्न आहे. पण ते पूर्ण करण्यासाठीचा मार्ग मात्र अजूनही खडतर आहे.जबाबदारी बाबत काय असा सवाल केल्यावर 'वो क्या होता है' असं उत्तर मोदींकडून मिळालं. इतर राजकीय नेत्यांसाठी असं वक्तव्य मगरुरपणाचं ठरलं असतं पण गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची ती स्टाईल आहे. मोदींसाठी प्रतिहल्ला हा स्वसंरक्षणाचा उत्तम उपाय राहिला. नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दहा वर्ष पूर्ण केलीत. त्यांच्या याच धोरणामुळे गेली दहा वर्ष ते गुजरातमध्ये एकहाथी सत्ता चालवत आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. पण भाजपचा केंद्रीय चेहरा बनण्याचे त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी अजून बरेच अडथळे आहेत. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना झालेली अटक मोदींचा दिल्लीला जाण्याचा मार्ग अजूनही किती खडतर आहे, याचंचं उदाहरण आहे. संघ परिवारालाही मोदींवर पूर्ण विश्वास नाही. तर तिकडे मोदींचे मेंटॉर लालकृष्ण अडवाणी मोदींचे कट्टर विरोधक असलेल्या नितीश कुमारांच्या राज्यातून रथयात्रा सुरू करत आहेत. त्यामुळे मोदींच्या काळजीत आणखी भरच पडलीय. 2002 चे दंगलपीडितांमध्येसुद्धा मोदींबद्दल कटुता आहे. मोदींविरोधात बोलणारे कमी नसले तरी उद्योग जगतातून मोदींना मिळणारा पाठिंबा वाढतोय. भारतच नाही तर जगभरातून उद्योजक गुजरातमध्ये गुंतवणूक करतायत. त्यात टाटांपासून तर अंबानींपर्यंतचा समावेश आहे. हा वर्ग मोदींच्या पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीचं समर्थन करतो. पण मोदींची ही प्रतिमा म्हणजे अतिशय कौशल्याने निर्माण केलेला आभास असल्याचे जाणकार सांगतात.सामाजिक कार्यकर्ते अच्युत याग्निक म्हणतात, गुजरातमध्ये 40 टक्के मुल कुपोषित आहेत. गुजरात विधानसभेनंसुद्धा हे कबूल केलंय. एकीकडी मोदींची खूपच चांगली प्रतिमा आहे तर दुसरीकडे त्यांचे तेवढेच कट्टर विरोधकही आहेत. त्यामुळे मोदी एकाच वेळी यश आणि अपयश दोन्हींचं उदाहरण आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 7, 2011 06:00 PM IST

नरेंद्र मोदींच्या मुख्यमंत्रीपदाला 10 वर्ष पूर्ण

07 ऑक्टोबर

नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचे एक दशक पूर्ण केलंय. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांची अटक हा मोदी यांच्या कार्यकाळातला एक वादग्रस्त निर्णय आहे. गेल्या दहा वर्षांत असे अनेक वादग्रस्त निर्णय त्यांनी घेतले आहेत. राष्ट्रीय राजकारणात प्रवेश हे त्यांचं गेल्या दहा वर्षातील स्वप्न आहे. पण ते पूर्ण करण्यासाठीचा मार्ग मात्र अजूनही खडतर आहे.जबाबदारी बाबत काय असा सवाल केल्यावर 'वो क्या होता है' असं उत्तर मोदींकडून मिळालं. इतर राजकीय नेत्यांसाठी असं वक्तव्य मगरुरपणाचं ठरलं असतं पण गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची ती स्टाईल आहे. मोदींसाठी प्रतिहल्ला हा स्वसंरक्षणाचा उत्तम उपाय राहिला. नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून दहा वर्ष पूर्ण केलीत. त्यांच्या याच धोरणामुळे गेली दहा वर्ष ते गुजरातमध्ये एकहाथी सत्ता चालवत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला. पण भाजपचा केंद्रीय चेहरा बनण्याचे त्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी अजून बरेच अडथळे आहेत. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांना झालेली अटक मोदींचा दिल्लीला जाण्याचा मार्ग अजूनही किती खडतर आहे, याचंचं उदाहरण आहे. संघ परिवारालाही मोदींवर पूर्ण विश्वास नाही. तर तिकडे मोदींचे मेंटॉर लालकृष्ण अडवाणी मोदींचे कट्टर विरोधक असलेल्या नितीश कुमारांच्या राज्यातून रथयात्रा सुरू करत आहेत. त्यामुळे मोदींच्या काळजीत आणखी भरच पडलीय. 2002 चे दंगलपीडितांमध्येसुद्धा मोदींबद्दल कटुता आहे.

मोदींविरोधात बोलणारे कमी नसले तरी उद्योग जगतातून मोदींना मिळणारा पाठिंबा वाढतोय. भारतच नाही तर जगभरातून उद्योजक गुजरातमध्ये गुंतवणूक करतायत. त्यात टाटांपासून तर अंबानींपर्यंतचा समावेश आहे. हा वर्ग मोदींच्या पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारीचं समर्थन करतो. पण मोदींची ही प्रतिमा म्हणजे अतिशय कौशल्याने निर्माण केलेला आभास असल्याचे जाणकार सांगतात.

सामाजिक कार्यकर्ते अच्युत याग्निक म्हणतात, गुजरातमध्ये 40 टक्के मुल कुपोषित आहेत. गुजरात विधानसभेनंसुद्धा हे कबूल केलंय. एकीकडी मोदींची खूपच चांगली प्रतिमा आहे तर दुसरीकडे त्यांचे तेवढेच कट्टर विरोधकही आहेत. त्यामुळे मोदी एकाच वेळी यश आणि अपयश दोन्हींचं उदाहरण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 7, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close