S M L

गोदिंयात उभारलं कॉल सेंटर !

गोपाळ मोटघरे, गोदिंया09 ऑक्टोबरमुंबई-पुण्यासारख्या शहरात कॉल सेंटर्समुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. साहजिकच या नोकर्‍यांसाठी ग्रामीण भागातल्या तरुणांनासुद्धा शहारांकडे धाव घ्यावी लागे. पण आता गोंदिया सारख्या आदिवासी तसेच मागासलेल्या भागातही नव्याने तयार होत असलेल्या कॉल सेंटर्समुळे तरूणांसाठी त्यांच्याच गावात नोकर्‍या उपलब्ध होत आहेत.अमित आणि सुनीता हे दोघेही पदवीधर . मेट्रोसिटीतल्या कॅालसेंटरमधल्या लाइफ स्टाईल बद्दल ऐकून होते. पण नक्षलग्रस्त आणि मागासलेल्या गोंदियासारख्या जिल्ह्यात राहत असल्याने त्यांना कधी या क्षेत्रात काम करण्याची संधीच मिळाली नाही. मात्र आता गोंदिया जिल्ह्यातही या इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहेत. आणि अमित, सुनीतासारख्या अनेक बेरोजगारांना यामधून नोकरीचा पर्यायही समोर आला.इंजिनिअर असलेल्या शैलेष अग्रवालांनी आपल्या जिल्ह्यातील तरूणांनाही असा हायटेक जॉब मिळवण्यासाठी काय करता येईलाचा विचार केला. आणि ही इंडस्ट्री उभारण्याचा निर्णय घेतला. आणि पाहता पाहता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अग्रवाल यांच्या या प्रयत्नांचे कौतुक यासाठीच की खेडोपाड्यातही आता ही इंडस्ट्री तर जाईलच. शिवाय नोकरीसाठी काढायचा शहरात पळ आणि तरीही तुटू न द्यायची गावची नाळ यातून होणारी अनेकांची होणारी फरपटही वाचेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2011 03:55 PM IST

गोदिंयात उभारलं कॉल सेंटर !

गोपाळ मोटघरे, गोदिंया

09 ऑक्टोबर

मुंबई-पुण्यासारख्या शहरात कॉल सेंटर्समुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. साहजिकच या नोकर्‍यांसाठी ग्रामीण भागातल्या तरुणांनासुद्धा शहारांकडे धाव घ्यावी लागे. पण आता गोंदिया सारख्या आदिवासी तसेच मागासलेल्या भागातही नव्याने तयार होत असलेल्या कॉल सेंटर्समुळे तरूणांसाठी त्यांच्याच गावात नोकर्‍या उपलब्ध होत आहेत.

अमित आणि सुनीता हे दोघेही पदवीधर . मेट्रोसिटीतल्या कॅालसेंटरमधल्या लाइफ स्टाईल बद्दल ऐकून होते. पण नक्षलग्रस्त आणि मागासलेल्या गोंदियासारख्या जिल्ह्यात राहत असल्याने त्यांना कधी या क्षेत्रात काम करण्याची संधीच मिळाली नाही. मात्र आता गोंदिया जिल्ह्यातही या इंडस्ट्रीची सुरुवात झाली आहेत. आणि अमित, सुनीतासारख्या अनेक बेरोजगारांना यामधून नोकरीचा पर्यायही समोर आला.

इंजिनिअर असलेल्या शैलेष अग्रवालांनी आपल्या जिल्ह्यातील तरूणांनाही असा हायटेक जॉब मिळवण्यासाठी काय करता येईलाचा विचार केला. आणि ही इंडस्ट्री उभारण्याचा निर्णय घेतला. आणि पाहता पाहता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अग्रवाल यांच्या या प्रयत्नांचे कौतुक यासाठीच की खेडोपाड्यातही आता ही इंडस्ट्री तर जाईलच. शिवाय नोकरीसाठी काढायचा शहरात पळ आणि तरीही तुटू न द्यायची गावची नाळ यातून होणारी अनेकांची होणारी फरपटही वाचेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2011 03:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close