S M L

नगरसेवक शितोळेला अटक करा अन्यथा आत्मदहनाचा ढोरे कुटुंबाचा इशारा

09 ऑक्टोबरपिंपरी-चिंचवड महापालिकेतला राष्ट्रवादीचा नगरसेवक प्रशांत शितोळेला त्वरीत अटक न झाल्यास आपण सहकुटुंब आत्मदहन करू असा इशारा मृत तुषार ढोरेच्या वडिलांनी दिला. प्रशांत शितोळेवर तुषारच्या खुनाचा गुन्हा दाखल असून तो 6 दिवसांपासून फरार आहे. 4 ऑक्टोबरला पिंपरीतल्या सांगवीमध्ये निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या मारामारीत तुषारचा मृत्यू होता. तुषारचा खून केल्याप्रकरणी शितोळेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शितोळेवर कारवाई करेल अशी आशा ढोरे कुटुंबीयांना होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शितोळेची पाठराखण केल्यानंतर ढोरे कुटुंबीयांनी आत्मदहनाचा इशारा दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2011 04:02 PM IST

नगरसेवक शितोळेला अटक करा अन्यथा आत्मदहनाचा ढोरे कुटुंबाचा इशारा

09 ऑक्टोबर

पिंपरी-चिंचवड महापालिकेतला राष्ट्रवादीचा नगरसेवक प्रशांत शितोळेला त्वरीत अटक न झाल्यास आपण सहकुटुंब आत्मदहन करू असा इशारा मृत तुषार ढोरेच्या वडिलांनी दिला. प्रशांत शितोळेवर तुषारच्या खुनाचा गुन्हा दाखल असून तो 6 दिवसांपासून फरार आहे. 4 ऑक्टोबरला पिंपरीतल्या सांगवीमध्ये निघालेल्या मिरवणुकीत दोन गटात झालेल्या मारामारीत तुषारचा मृत्यू होता. तुषारचा खून केल्याप्रकरणी शितोळेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शितोळेवर कारवाई करेल अशी आशा ढोरे कुटुंबीयांना होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शितोळेची पाठराखण केल्यानंतर ढोरे कुटुंबीयांनी आत्मदहनाचा इशारा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2011 04:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close