S M L

...ते हेलिकॉप्टर भरकटल्यामुळे उतरले ; गावकर्‍यांना 10 हजारांचे बक्षीस

09 ऑक्टोबररत्नागिरी जिल्ह्यात दापोलीच्या हर्णे बीचवर काल शनिवारी संध्याकाळी अचानक उतरलेल्या हेलिकॉप्टर प्रकरणी आता ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीने खुलासा केला आहे. भरकटल्यामुळे कुणालाही न कळवता अचानक हेलिकॉप्टरचं लँडिंग केलं असं कंपनींचं म्हणणं आहे. मात्र या प्रकरणी एटीएस आणि जुहू पोलीस तपास करत आहे. दरम्यान पोलिसांना माहिती देणार्‍या गावकर्‍यांना 10 हजारांचे बक्षीस जाहीर केल्याची घोषणा आर.आर. पाटील यांनी केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. काल शनिवारी दापोलीच्या हर्णे बीचवर एक अज्ञात हेलिकॅाप्टर उतरुन काही मिनिटातच परत गेल्याने खळबळ उडाली होती. या हेलिकॉप्टरमधून दोघे जण उतरले आणि काही छायाचित्रे काढून लगेचच परत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. हे हेलिकॉप्टर ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीचं होतं. हे हेलिकॉप्टर बंगलोरहून जुहूकडे निघालं होतं. हेलिकॅाप्टर भरकटल्यामुळे कुणालाही न कळवता अचानक हेलिकॉप्टरचं लँडिंग केलं असं कंपनींचं म्हणणं आहे. गावकर्‍यांनी दाखवलेल्या सतर्कपणामुळे हा प्रकार तातडीत उघडकीस आला. यामुळे दापोली पोलिसंानी ताबडतोब सुत्र हालवली आणि झालेल्या प्रकारावर कंपनीने खुलासा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 9, 2011 10:54 AM IST

...ते हेलिकॉप्टर भरकटल्यामुळे उतरले ; गावकर्‍यांना 10 हजारांचे बक्षीस

09 ऑक्टोबर

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीच्या हर्णे बीचवर काल शनिवारी संध्याकाळी अचानक उतरलेल्या हेलिकॉप्टर प्रकरणी आता ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीने खुलासा केला आहे. भरकटल्यामुळे कुणालाही न कळवता अचानक हेलिकॉप्टरचं लँडिंग केलं असं कंपनींचं म्हणणं आहे. मात्र या प्रकरणी एटीएस आणि जुहू पोलीस तपास करत आहे. दरम्यान पोलिसांना माहिती देणार्‍या गावकर्‍यांना 10 हजारांचे बक्षीस जाहीर केल्याची घोषणा आर.आर. पाटील यांनी केली आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने पोलीस यंत्रणा सतर्क झाली.

काल शनिवारी दापोलीच्या हर्णे बीचवर एक अज्ञात हेलिकॅाप्टर उतरुन काही मिनिटातच परत गेल्याने खळबळ उडाली होती. या हेलिकॉप्टरमधून दोघे जण उतरले आणि काही छायाचित्रे काढून लगेचच परत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. हे हेलिकॉप्टर ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीचं होतं. हे हेलिकॉप्टर बंगलोरहून जुहूकडे निघालं होतं. हेलिकॅाप्टर भरकटल्यामुळे कुणालाही न कळवता अचानक हेलिकॉप्टरचं लँडिंग केलं असं कंपनींचं म्हणणं आहे. गावकर्‍यांनी दाखवलेल्या सतर्कपणामुळे हा प्रकार तातडीत उघडकीस आला. यामुळे दापोली पोलिसंानी ताबडतोब सुत्र हालवली आणि झालेल्या प्रकारावर कंपनीने खुलासा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 9, 2011 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close