S M L

गझलसम्राट हरपला

10 ऑक्टोबर, मुंबईआपल्या मोरपिशी आवाजाने सर्वसामान्यांपर्यंत गझल पोहोचवणारे गझलसम्राट जगजीत सिंग यांचं आज लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानं त्यांना 23 सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते सतत मृत्युशी झुंज देत होते. आपल्या हळुवार स्वरांनी गझलला लोकप्रिय करणारे जगजित सिंग यांचं व्यक्तिमत्वही तसेच निर्मळ होतं. हिंदीसोबतच उर्दू गझलही त्यांनी लोकप्रिय केली. त्यामुळेच अनेक अवघड गझल्सही सर्वसामान्यांच्या ओठावर सहज रूळल्या. अक्षरश: लग्नसमारंभात गाऊन त्यांना करियरची सुरूवात करावी लागली होती. पण नाऊमेद न होता त्यांनी कारकीर्द घडवली. 1990 मध्ये त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांना धक्का बसला. पण त्यातून सावरत त्यांनी पुन्हा गझललाच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. जगजीत सिंग यांचा जीवनप्रवास - जन्म- 8 फेब्रुवारी 1941 - राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये जन्म- वडिलांकडून संगिताचा वारसा- खालसा हायस्कूल, जालंधरच्या डीएव्ही कॉलेज, कुरूक्षेत्र युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण- पं.छगनलाल शर्मा यांच्याकडे संगीताचं शिक्षण- उस्ताद जमाल खान यांच्याकडून ख्याल, ठुमरी आणि ध्रुपद गायनाचं शिक्षण- 1965 साली मुंबईत स्थायिक- जाहीरातींचे जिंगल्स गाऊन कारकिर्दीची सुरूवात- 1967 मध्ये त्यांची चित्रा सिंहशी ओळख झाली- 1969 मध्ये चित्रा सिंहशी लग्न- द गझल किंग नावानं लोकप्रिय- 1990 मध्ये एकुलत्या एका मुलाचं निधन- हिंदी आणि उर्दूबरोबरच पंजाबी, गुजराथी,सिंधी आणि नेपाळी भाषांमध्ये गायन- 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2011 07:00 AM IST

गझलसम्राट हरपला

10 ऑक्टोबर, मुंबई

आपल्या मोरपिशी आवाजाने सर्वसामान्यांपर्यंत गझल पोहोचवणारे गझलसम्राट जगजीत सिंग यांचं आज लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. ब्रेन हॅमरेज झाल्यानं त्यांना 23 सप्टेंबरला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते सतत मृत्युशी झुंज देत होते.

आपल्या हळुवार स्वरांनी गझलला लोकप्रिय करणारे जगजित सिंग यांचं व्यक्तिमत्वही तसेच निर्मळ होतं. हिंदीसोबतच उर्दू गझलही त्यांनी लोकप्रिय केली. त्यामुळेच अनेक अवघड गझल्सही सर्वसामान्यांच्या ओठावर सहज रूळल्या. अक्षरश: लग्नसमारंभात गाऊन त्यांना करियरची सुरूवात करावी लागली होती. पण नाऊमेद न होता त्यांनी कारकीर्द घडवली. 1990 मध्ये त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला आणि त्यांना धक्का बसला. पण त्यातून सावरत त्यांनी पुन्हा गझललाच आपल्या आयुष्याचं ध्येय बनवलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

जगजीत सिंग यांचा जीवनप्रवास

- जन्म- 8 फेब्रुवारी 1941

- राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये जन्म

- वडिलांकडून संगिताचा वारसा

- खालसा हायस्कूल, जालंधरच्या डीएव्ही कॉलेज, कुरूक्षेत्र युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण

- पं.छगनलाल शर्मा यांच्याकडे संगीताचं शिक्षण

- उस्ताद जमाल खान यांच्याकडून ख्याल, ठुमरी आणि ध्रुपद गायनाचं शिक्षण

- 1965 साली मुंबईत स्थायिक

- जाहीरातींचे जिंगल्स गाऊन कारकिर्दीची सुरूवात

- 1967 मध्ये त्यांची चित्रा सिंहशी ओळख झाली

- 1969 मध्ये चित्रा सिंहशी लग्न

- द गझल किंग नावानं लोकप्रिय

- 1990 मध्ये एकुलत्या एका मुलाचं निधन

- हिंदी आणि उर्दूबरोबरच पंजाबी, गुजराथी,सिंधी आणि नेपाळी भाषांमध्ये गायन

- 2003 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2011 07:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close