S M L

सोनवणे जळीत हत्याकांड लाचखोरीतून ?

11 ऑक्टोबरनाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीतकांडप्रकरणाला आता वेगळ वळण मिळालं आहे. यशवंत सोनवणे आणि पोपट शिंदे यांच्यात वैमनस्य होतं. महत्वाचे म्हणजे पोपट शिंदेचा टँकर सोडवण्यासाठी यशवंत सोनवणेंनी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती असा खळबळजनक दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. सीबीआयने काल मनमाड आणि मालेगाव कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र आयबीएन-लोकमतच्या हाती लागले आहे. 25 जानेवारीला अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पानेवाडीजवळ तेलमाफिया पोपट शिंदेच्या ढाब्यावर पेट्रोलमध्ये भेसळ करताना रंगेहाथ पकडले होते.यावेळी झालेल्या बाचाबाचीतून पोपट शिंदे आणि त्याच्या सहकार्‍यांनी सोनवणे यांना जीवंत जाळले होते. यावेळी पोपट शिंदेही भाजला होता. पोपट शिंदेला मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी काल 10 आरोपींवर सीबीआयने आरोपत्र दाखल केलं. या आरोपत्रात 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केलं आहे. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हे आरोपपत्र आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहे. यामध्येयशवंत सोनवणे आणि पोपट शिंदे यांचं पूर्व वैमनस्य असल्याचं सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर यशवंत सोनवणेंनी 75 हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल पोपट शिंदेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या ऍण्टी करप्शन ब्युरोनं 30 /08/2010 आणि 31/08/2011 ला रचलेल्या सापळ्याचे पुरावेही सीबीआयच्या या आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत. पोपट शिंदेचा टँकर सोडवण्यासाठी सोनवणेंनी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार पोपट शिंदेनं गेल्या वर्षी 10 जून ला केल्याचे आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे. तेल भेसळीतल्या स्थानिक यंत्रणेच्या सहभागामुळे सोनवणे जळीतकांड झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यामुळेच हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. आता पोलिसांपुढचे आवाहन आहे ते या प्रकरणी त्यांनी लावलेला मोक्का सिद्ध करण्याचं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2011 11:51 AM IST

सोनवणे जळीत हत्याकांड लाचखोरीतून ?

11 ऑक्टोबर

नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीतकांडप्रकरणाला आता वेगळ वळण मिळालं आहे. यशवंत सोनवणे आणि पोपट शिंदे यांच्यात वैमनस्य होतं. महत्वाचे म्हणजे पोपट शिंदेचा टँकर सोडवण्यासाठी यशवंत सोनवणेंनी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती असा खळबळजनक दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. सीबीआयने काल मनमाड आणि मालेगाव कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र आयबीएन-लोकमतच्या हाती लागले आहे. 25 जानेवारीला अपर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पानेवाडीजवळ तेलमाफिया पोपट शिंदेच्या ढाब्यावर पेट्रोलमध्ये भेसळ करताना रंगेहाथ पकडले होते.यावेळी झालेल्या बाचाबाचीतून पोपट शिंदे आणि त्याच्या सहकार्‍यांनी सोनवणे यांना जीवंत जाळले होते. यावेळी पोपट शिंदेही भाजला होता. पोपट शिंदेला मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी काल 10 आरोपींवर सीबीआयने आरोपत्र दाखल केलं. या आरोपत्रात 10 आरोपींवर आरोपत्र दाखल केलं आहे. या हत्याकांडातील 3 जणांवर खुनाचा आरोप दाखल करण्यात आला आहे. तर 6 लोकांवर जिवनावश्यक वस्तू कायदा अन्वये आणि दंगली प्रकरणी आरोप दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हे आरोपपत्र आयबीएन लोकमतच्या हाती लागले आहे. यामध्ये

यशवंत सोनवणे आणि पोपट शिंदे यांचं पूर्व वैमनस्य असल्याचं सीबीआयच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर यशवंत सोनवणेंनी 75 हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल पोपट शिंदेच्या तक्रारीनंतर नाशिकच्या ऍण्टी करप्शन ब्युरोनं 30 /08/2010 आणि 31/08/2011 ला रचलेल्या सापळ्याचे पुरावेही सीबीआयच्या या आरोपपत्रासोबत जोडण्यात आले आहेत.

पोपट शिंदेचा टँकर सोडवण्यासाठी सोनवणेंनी 1 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार पोपट शिंदेनं गेल्या वर्षी 10 जून ला केल्याचे आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटलं आहे. तेल भेसळीतल्या स्थानिक यंत्रणेच्या सहभागामुळे सोनवणे जळीतकांड झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. त्यामुळेच हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता. आता पोलिसांपुढचे आवाहन आहे ते या प्रकरणी त्यांनी लावलेला मोक्का सिद्ध करण्याचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2011 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close