S M L

दहशतवादाचं समर्थन करणार्‍यांवर कारवाई करू- उपमुख्यमंत्री

17 नोव्हेंबर, मुंबई मुंबई-समझोता एक्सप्रेसमधल्या स्फोटात आरडीएक्स प्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी या प्रकरणाचा पूर्ण तपास होईपर्यंत बोलण्याचा आग्रह धरु नका, अशी मिडियाला विनंती केली. तपास पूर्ण झाल्यावर आम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याच उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांनी म्हटलंय. अटक झालेले दोषी आढळल्यास सध्या जे दहशतवादाचं उघडपणे समर्थन करताहेत, त्यांच्यावर कारवाई करू, असाही इशारा त्यांनी दिला आहे. ' याप्रकरणी तपास पूर्ण झाल्यानंतर कोर्टात पुरावे सादर होत असताना आरोपींचं कोणी समर्थन केलं असेल तर कायद्यातील तरतूदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल ', असं आर.आर.पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यासंदर्भांत बोलताना भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर म्हणाले की आम्ही दहशतवाद्याचं कधी समर्थन केलं नाही. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्याप्रकारे एटीएसचा वापर करतेय, त्यामुळे जनतेमध्ये राग आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 17, 2008 02:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 17, 2008 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close