S M L

वेताळ टेकडीच्‍या बांधकामावर हरकतीची 'खड्डा' !

10 ऑक्टोबरपुण्यातल्या वेताळ टेकडीवरील बांधकामाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासुन गाजतोय. आज टेकडीवर बांधकामाला परवानगी देण्यात यावी का नाही यासाठी नगरविकास खात्यातर्फे सुनावणी घेण्यात आली. वेताळ टेकडीवर एआरएआय (ARAI) ही ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे. त्या संस्थेच्या एक्स्पान्शनसाठी बांधकामाची परवानगी या संस्थेने मागितली होती. हा प्रस्ताव राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला पाठवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच पुणे महापालिकेने या प्रस्तावाला मान्यता दिली. यानंतर तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने याविषयी हरकती आणि सुचना मागवल्या होत्या. त्यानुसार आज सुनावणी घेण्यात आली. एकू ण 3900 हरकती सुचना नोंदवल्या आहेत. त्यानुसार आम्ही ही सुनावणी घेऊन त्याची माहिती राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचे नगरविकास खात्याचे उपअभियंते अविनाश पाटील यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 10, 2011 05:23 PM IST

वेताळ टेकडीच्‍या बांधकामावर हरकतीची 'खड्डा' !

10 ऑक्टोबर

पुण्यातल्या वेताळ टेकडीवरील बांधकामाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासुन गाजतोय. आज टेकडीवर बांधकामाला परवानगी देण्यात यावी का नाही यासाठी नगरविकास खात्यातर्फे सुनावणी घेण्यात आली. वेताळ टेकडीवर एआरएआय (ARAI) ही ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये काम करणारी संस्था आहे. त्या संस्थेच्या एक्स्पान्शनसाठी बांधकामाची परवानगी या संस्थेने मागितली होती. हा प्रस्ताव राज्य सरकारकडून पुणे महापालिकेला पाठवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच पुणे महापालिकेने या प्रस्तावाला मान्यता दिली. यानंतर तो राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने याविषयी हरकती आणि सुचना मागवल्या होत्या. त्यानुसार आज सुनावणी घेण्यात आली. एकू ण 3900 हरकती सुचना नोंदवल्या आहेत. त्यानुसार आम्ही ही सुनावणी घेऊन त्याची माहिती राज्य सरकारकडे पाठवणार असल्याचे नगरविकास खात्याचे उपअभियंते अविनाश पाटील यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 10, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close