S M L

मॅच फिक्सिंगमध्ये हरभजन, युवराजचे नाव ?

11 ऑक्टोबरक्रिकेटला काळिमा फासणार्‍या मॅच फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेटपटूंची नाव आल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी खेळाडूंचा एजंट म्हणून काम करणार्‍या मझहर माजिदने भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे आपले मित्र असून मी त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी सध्या लंडनमधल्या साऊथवर्क क्राऊन कोर्टात सुरु आहे. या सुनावणीदरम्यान माजीदनंही ही माहिती दिली. पण मॅचफिक्सिंगमध्ये युवराज आणि हरभजन सिंग होते असं थेट विधान मात्र माजिदनं केलेलं नाही. आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी हेही आपले मित्र असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे माईक गॅटिंग, फिल टफनेल, जेफ्री बॉयकॉट आणि पाकिस्तान क्रिकेटर इमरान खान यांनाही आपण ओळखत असल्याचे माजिदनं म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2011 12:05 PM IST

मॅच फिक्सिंगमध्ये हरभजन, युवराजचे नाव ?

11 ऑक्टोबर

क्रिकेटला काळिमा फासणार्‍या मॅच फिक्सिंग प्रकरणात भारतीय क्रिकेटपटूंची नाव आल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी खेळाडूंचा एजंट म्हणून काम करणार्‍या मझहर माजिदने भारतीय क्रिकेटर युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे आपले मित्र असून मी त्यांच्या संपर्कात असल्याचे म्हटलं आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची सुनावणी सध्या लंडनमधल्या साऊथवर्क क्राऊन कोर्टात सुरु आहे. या सुनावणीदरम्यान माजीदनंही ही माहिती दिली. पण मॅचफिक्सिंगमध्ये युवराज आणि हरभजन सिंग होते असं थेट विधान मात्र माजिदनं केलेलं नाही. आयपीएलचे माजी कमिशनर ललित मोदी हेही आपले मित्र असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे माईक गॅटिंग, फिल टफनेल, जेफ्री बॉयकॉट आणि पाकिस्तान क्रिकेटर इमरान खान यांनाही आपण ओळखत असल्याचे माजिदनं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2011 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close