S M L

रत्नागिरीत मच्छीमारांचा संघर्ष टोकाला !

केळुसकर, रत्नागिरी 11 ऑक्टोबरमासेमारीच्या हक्कावरून मालवणच्या मच्छीमारात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत पर्ससीन जाळ्याने यांत्रिक नौकांना किनार्‍यालगत मासेमारी करू देणार नाही. या इराद्याने पारंपरिक मच्छीमार पेटून उठले आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आपल्याला समुद्रात कुठेही मासेमारी करता येऊ शकते अशी भुमिका यांत्रिकी नौकाधारकांनी घेतल्यामुळे हा वाद आणखीनच भडकण्याची शक्यता आहे.मालवणच्या देवबाग, वायरी, दांडी किनार्‍यावर राहणारे मच्छीमार गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पध्दतीने मासेमारी करत आहे. हे मच्छीमार छोट्या फ़ायबर बोटी आणि गिलनेट जाळ्यांचा वापर करुन मच्छीमारी करतात. पण पर्ससीन जाळं वापरणार्‍या धनिक मच्छीमारांमुळे आपला हा व्यवसाय धोक्यात आल्याची या मच्छीमारांची भावना आहे. महाराष्ट्राच्या रेग्यूलेशन ऍक्टनुसार 0 ते 10 फॅदम अंतर पारंपरिक मच्छीमारांसाठी राखीव आहे. पण या क्षेत्रावर पर्ससीनवाल्यांचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार संकटात सापडला आहे.पर्ससीन नेट जी असते मासळीसाठी जे वापरलं जातं ट्रॉलरधारकांकडून अत्यंत कमी जगेत खूप मेश असतात त्याचे आणि 500 मीटरव्यसाच्या वर्तुळच्या परिघाचं क्षेत्र हे जाळं व्यापतं,जवळपास दीड किलोमीटरची लांबी या जाळ्याने व्यापली जाते आणि अगदी छोट्या मत्स्यबीजापासून ते मोठ्या माशापर्यंत जो काही मासळीचा कॅच आहे तो या जाळ्यात अगदी खरवडून घेतला जातो आणि त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना काही ही उरत नाही.पर्ससीन जाळ्याचा वापर करणार्‍या धनिक मालकांविरोधात मालवणमधल्या या पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र संघर्ष पुकारला आहे. गेले आठ दिवस पर्ससीन बोटी बंद आहेत. त्यामुळे पर्ससीन धारकांनी पालकमंत्री नारायण राणेंकडे धाव घेतली. मात्र कितीही दबाव आला तरी आपला लढा मागं घ्यायचा नाही असा ठाम पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहेत.मच्छीमार महेश सावजी म्हणतात, आम्ही ठासून यांना विरोध करणार आहोत. कारण आमची उपजिविका जी आहे ती या मत्सउद्योगावरच अवलंबून आहे. कुठल्याही प्रकारच्या शासन यंत्रणेचा दबाव किंवा कुठल्याही पक्षाचा दबाव आमच्यवरती आला तर आम्ही तो झुगारून देणार आहोत.सुप्रीम कोर्टाच्या 2004 च्या निकालानुसार पर्ससीन धारकांना 0 ते 12 नॉटीकल मैलापर्यंत म्हणजे किनार्‍यापासून 22 किलोमीटरपर्यंत मासेमारी करण्यास मुभा आहे. याचाच पर्ससीन धारक आधार घेत आहेत. यावर येत्या 13 ऑक्टोबरला नारायण राणेंच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही बाजूंची बैठक बोलावलीय. यात तरी हा तिढा सुटतोय का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2011 03:17 PM IST

रत्नागिरीत मच्छीमारांचा संघर्ष टोकाला !

केळुसकर, रत्नागिरी

11 ऑक्टोबर

मासेमारीच्या हक्कावरून मालवणच्या मच्छीमारात जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत पर्ससीन जाळ्याने यांत्रिक नौकांना किनार्‍यालगत मासेमारी करू देणार नाही. या इराद्याने पारंपरिक मच्छीमार पेटून उठले आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आपल्याला समुद्रात कुठेही मासेमारी करता येऊ शकते अशी भुमिका यांत्रिकी नौकाधारकांनी घेतल्यामुळे हा वाद आणखीनच भडकण्याची शक्यता आहे.

मालवणच्या देवबाग, वायरी, दांडी किनार्‍यावर राहणारे मच्छीमार गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पध्दतीने मासेमारी करत आहे. हे मच्छीमार छोट्या फ़ायबर बोटी आणि गिलनेट जाळ्यांचा वापर करुन मच्छीमारी करतात. पण पर्ससीन जाळं वापरणार्‍या धनिक मच्छीमारांमुळे आपला हा व्यवसाय धोक्यात आल्याची या मच्छीमारांची भावना आहे. महाराष्ट्राच्या रेग्यूलेशन ऍक्टनुसार 0 ते 10 फॅदम अंतर पारंपरिक मच्छीमारांसाठी राखीव आहे. पण या क्षेत्रावर पर्ससीनवाल्यांचा धुमाकूळ सुरु आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमार संकटात सापडला आहे.

पर्ससीन नेट जी असते मासळीसाठी जे वापरलं जातं ट्रॉलरधारकांकडून अत्यंत कमी जगेत खूप मेश असतात त्याचे आणि 500 मीटरव्यसाच्या वर्तुळच्या परिघाचं क्षेत्र हे जाळं व्यापतं,जवळपास दीड किलोमीटरची लांबी या जाळ्याने व्यापली जाते आणि अगदी छोट्या मत्स्यबीजापासून ते मोठ्या माशापर्यंत जो काही मासळीचा कॅच आहे तो या जाळ्यात अगदी खरवडून घेतला जातो आणि त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांना काही ही उरत नाही.पर्ससीन जाळ्याचा वापर करणार्‍या धनिक मालकांविरोधात मालवणमधल्या या पारंपरिक मच्छीमारांनी तीव्र संघर्ष पुकारला आहे. गेले आठ दिवस पर्ससीन बोटी बंद आहेत. त्यामुळे पर्ससीन धारकांनी पालकमंत्री नारायण राणेंकडे धाव घेतली. मात्र कितीही दबाव आला तरी आपला लढा मागं घ्यायचा नाही असा ठाम पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहेत.मच्छीमार महेश सावजी म्हणतात, आम्ही ठासून यांना विरोध करणार आहोत. कारण आमची उपजिविका जी आहे ती या मत्सउद्योगावरच अवलंबून आहे. कुठल्याही प्रकारच्या शासन यंत्रणेचा दबाव किंवा कुठल्याही पक्षाचा दबाव आमच्यवरती आला तर आम्ही तो झुगारून देणार आहोत.

सुप्रीम कोर्टाच्या 2004 च्या निकालानुसार पर्ससीन धारकांना 0 ते 12 नॉटीकल मैलापर्यंत म्हणजे किनार्‍यापासून 22 किलोमीटरपर्यंत मासेमारी करण्यास मुभा आहे. याचाच पर्ससीन धारक आधार घेत आहेत. यावर येत्या 13 ऑक्टोबरला नारायण राणेंच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकार्‍यांनी दोन्ही बाजूंची बैठक बोलावलीय. यात तरी हा तिढा सुटतोय का याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2011 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close