S M L

वीज द्या नाही तर विष द्या !

11 ऑक्टोबरऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यभरात लोडशेडिंगमुळे अंधार निर्माण झाला आहे. वीज द्या नाही तर विष द्या अशी संतप्त मागणी जनप्रतिनिधी करत आहे. राज्याच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून लोडशेडिंग तीन तासांपासून काही ठिकाणी ते तब्बल 22 तासांपर्यंत पोहचलं आहे. सध्या राज्यात 3 हजार मेगावॅट वीजेची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी, नागरीक, उद्योजक, व्यावसायिक या सगळ्यांना या लोडशेडिंगचा फटका बसतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये सरकारच्याविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक शहरात संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर हल्ला केला. एकीकडे महाराष्ट्र अंधारात असताना उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार खडकवासला पोटनिवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. त्यातच विरोधी पक्षांनीही या प्रश्नावर सरकारला घेरायला सुरुवात केली. संकट वेळीच थांबवलं नाही तर राज्यभर आंदोलन करु असा इशारा भाजपनं दिला आहे. त्यामुळे आता कुठे सरकारला जाग आली आहे. आज सरकारकडून बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची बैठक बोलावलीय तर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उर्जामंत्री अजित पवार आता दिल्लीला जाणार आहेत. लोडशेडिंगच्या पार्श्वभूमिवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.महावितरणच्या अधिकार्‍यांची अरेरावी उद्दामपणा यामुळे नागरिक त्रस्त आहेतच. पण नियोजन शुन्य कारभार कसा असतो याचा विदारक अनुभव विदर्भातले नागरिक गेली अनेक वर्षे घेताहेत.महावितरणचे असेही 'दिवे' उत्तर महाराष्ट्र - अहमदनगर : राहुरी - 14 तास - धुळे : 7 तास - जळगाव : शिरसोली - 13 तासजिल्हा- अकोला500 मेगावॅट वीज निर्मिती करणार्‍या पारसमध्येच 10 तास लोडशेडिंगजिल्हा - अमरावती36 गावांत 1998 ला वीज आली, दुसर्‍या दिवशी गेली, ती परत आलीच नाहीजिल्हा गोंदिया करंजी गावात एकदा लाईट गेले तर परत यायला महिना तरी लागतो जिल्हा- गडचिरोलीसिरोंचा तालुक्यातील झिंगानूर गावात 10 दिवसांपासून बत्ती गुल बुलढाण्यात शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशाराबुलढाण्यात लोडशेडिंगच्या विरोधात शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख ऍड हरिश रावळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकर्‍यांनी महावितरणच्या सब स्टेशनची तोडफोड केली. बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही तोडफोड करण्यात आली. गेले पाच सहा दिवसांपासून सुरु आसलेल्या लोडशेडिंगमुळे शेतीच्या पिकांचं नुकसान होतंय. त्यामुळे शेतकर्‍यांचा उद्रेक झाला. जर लोडशेडिंग असेच सुरु राहिले तर हे आक्रमक आंदोलन असेच सुरु राहील असा इशाराही या शेतकर्‍यांनी दिला. यवतमाळमध्ये महावितरण कार्यालयाची तोडफोडशिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी इथल्या महावितरणाच्या कार्यालयाची तोडफोड केली. यवतमाळ जिल्ह्यातल्या उत्तर वाढोणा या गावातल्या शेतकर्‍यांनी तब्बल चार तास रास्तारोको आंदोलन करुन सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात 12 तास आणि शहरी भागात 6 तास लोडशेडिंग होतंय त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.लोडशेडिंगमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होतंय. त्यांच्या हाताशी आलेलं पीक हातातून निघून जाण्याची वेळ आलीय.त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. जळगावमध्ये शिवसैनिकांडून तोडफोडजळगाव जिल्ह्यात धरणगावमध्ये लोडशेडिंगविरोधात महावितरणच्या ऑफिसची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह 125 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. खाजगी वीज घेण्यास सरकाराचा सुस्त दरम्यान, राज्यात वीजटंचाईबाबत गंभीर संकट असताना सरकार मात्र खाजगी प्रकल्पांमधुन जादा वीज घेण्यास उत्सुक नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रत्नागिरीच्या जिंदाल प्रकल्पामधुन सध्या राज्यसरकार 576 मेगावॅट वीज उचलतेय. राज्य सरकारकडून वीज खरेदीची हमी मिळाल्यास हा प्रकल्प किमान 1200 मेगावॅट वीज सरकारला देऊ शकतो मात्र राज्य सरकारने या प्रकल्पशी केवळ 300 मेगावॅट वीज खरेदीच्या सुरुवातीच्या करारानंतर कोणताही वाढ़ीव वीज खरेदीचा करार केलेला नाही. जिंदाल प्रकल्पाला कोळशाचीही कोणती समस्या सध्या नसल्याचं समजतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2011 04:20 PM IST

वीज द्या नाही तर विष द्या !

11 ऑक्टोबर

ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यभरात लोडशेडिंगमुळे अंधार निर्माण झाला आहे. वीज द्या नाही तर विष द्या अशी संतप्त मागणी जनप्रतिनिधी करत आहे. राज्याच्या अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून लोडशेडिंग तीन तासांपासून काही ठिकाणी ते तब्बल 22 तासांपर्यंत पोहचलं आहे. सध्या राज्यात 3 हजार मेगावॅट वीजेची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी, नागरीक, उद्योजक, व्यावसायिक या सगळ्यांना या लोडशेडिंगचा फटका बसतोय. त्यामुळे नागरिकांमध्ये सरकारच्याविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

गेल्या दोन दिवसात राज्यातील अनेक शहरात संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर हल्ला केला. एकीकडे महाराष्ट्र अंधारात असताना उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार खडकवासला पोटनिवडणुकीच्या प्रचारात मग्न आहेत. त्यातच विरोधी पक्षांनीही या प्रश्नावर सरकारला घेरायला सुरुवात केली. संकट वेळीच थांबवलं नाही तर राज्यभर आंदोलन करु असा इशारा भाजपनं दिला आहे.

त्यामुळे आता कुठे सरकारला जाग आली आहे. आज सरकारकडून बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. मुख्यमंत्र्यांनी एक महत्वाची बैठक बोलावलीय तर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे उर्जामंत्री अजित पवार आता दिल्लीला जाणार आहेत. लोडशेडिंगच्या पार्श्वभूमिवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

महावितरणच्या अधिकार्‍यांची अरेरावी उद्दामपणा यामुळे नागरिक त्रस्त आहेतच. पण नियोजन शुन्य कारभार कसा असतो याचा विदारक अनुभव विदर्भातले नागरिक गेली अनेक वर्षे घेताहेत.

महावितरणचे असेही 'दिवे'

उत्तर महाराष्ट्र

- अहमदनगर : राहुरी - 14 तास - धुळे : 7 तास - जळगाव : शिरसोली - 13 तास

जिल्हा- अकोला

500 मेगावॅट वीज निर्मिती करणार्‍या पारसमध्येच 10 तास लोडशेडिंग

जिल्हा - अमरावती36 गावांत 1998 ला वीज आली, दुसर्‍या दिवशी गेली, ती परत आलीच नाही

जिल्हा गोंदिया करंजी गावात एकदा लाईट गेले तर परत यायला महिना तरी लागतो

जिल्हा- गडचिरोलीसिरोंचा तालुक्यातील झिंगानूर गावात 10 दिवसांपासून बत्ती गुल

बुलढाण्यात शेतकर्‍यांचा आंदोलनाचा इशारा

बुलढाण्यात लोडशेडिंगच्या विरोधात शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख ऍड हरिश रावळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच शेतकर्‍यांनी महावितरणच्या सब स्टेशनची तोडफोड केली. बुलढाणा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही तोडफोड करण्यात आली. गेले पाच सहा दिवसांपासून सुरु आसलेल्या लोडशेडिंगमुळे शेतीच्या पिकांचं नुकसान होतंय. त्यामुळे शेतकर्‍यांचा उद्रेक झाला. जर लोडशेडिंग असेच सुरु राहिले तर हे आक्रमक आंदोलन असेच सुरु राहील असा इशाराही या शेतकर्‍यांनी दिला.

यवतमाळमध्ये महावितरण कार्यालयाची तोडफोड

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी इथल्या महावितरणाच्या कार्यालयाची तोडफोड केली. यवतमाळ जिल्ह्यातल्या उत्तर वाढोणा या गावातल्या शेतकर्‍यांनी तब्बल चार तास रास्तारोको आंदोलन करुन सरकारचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागात 12 तास आणि शहरी भागात 6 तास लोडशेडिंग होतंय त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय.लोडशेडिंगमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होतंय. त्यांच्या हाताशी आलेलं पीक हातातून निघून जाण्याची वेळ आलीय.त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

जळगावमध्ये शिवसैनिकांडून तोडफोड

जळगाव जिल्ह्यात धरणगावमध्ये लोडशेडिंगविरोधात महावितरणच्या ऑफिसची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांच्यासह 125 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. खाजगी वीज घेण्यास सरकाराचा सुस्त

दरम्यान, राज्यात वीजटंचाईबाबत गंभीर संकट असताना सरकार मात्र खाजगी प्रकल्पांमधुन जादा वीज घेण्यास उत्सुक नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. रत्नागिरीच्या जिंदाल प्रकल्पामधुन सध्या राज्यसरकार 576 मेगावॅट वीज उचलतेय. राज्य सरकारकडून वीज खरेदीची हमी मिळाल्यास हा प्रकल्प किमान 1200 मेगावॅट वीज सरकारला देऊ शकतो मात्र राज्य सरकारने या प्रकल्पशी केवळ 300 मेगावॅट वीज खरेदीच्या सुरुवातीच्या करारानंतर कोणताही वाढ़ीव वीज खरेदीचा करार केलेला नाही. जिंदाल प्रकल्पाला कोळशाचीही कोणती समस्या सध्या नसल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2011 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close