S M L

अडवाणींच्या जनचेतना रथयात्रेला आजपासून सुरुवात

11 ऑक्टोबरभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या भ्रष्टाचारा-विरोधातल्या जनचेतना रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली. गुजरातऐवजी बिहारमधील छपरा इथल्या सिताब दियारा या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मगावातून या यात्रेची सुरुवात झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अडवाणींच्या रथयात्रेला झेंडा दाखवला. फक्त सत्ताच नाही तर व्यवस्था परिवर्तन व्हायला हवं. भ्रष्टाचाराच्या विरोधात केंद्र सरकार काहीच करत नाही. याबद्दलच जागृती करण्यासाठी आपण ही जनचेतना यात्रा काढली असल्याचं अडवाणींनी म्हटलंय. 18 राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. 20 नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या यात्रेचा दिल्लीत समारोप होणार आहे. एकूण 75 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. ही यात्रा एकूण 38 दिवसांची आहे.दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवर लालू प्रसाद यादव यांनी टीका केली. ही रथयात्रा म्हणजे निव्वळ देखावा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2011 11:30 AM IST

अडवाणींच्या जनचेतना रथयात्रेला आजपासून सुरुवात

11 ऑक्टोबर

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या भ्रष्टाचारा-विरोधातल्या जनचेतना रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली. गुजरातऐवजी बिहारमधील छपरा इथल्या सिताब दियारा या जयप्रकाश नारायण यांच्या जन्मगावातून या यात्रेची सुरुवात झाली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अडवाणींच्या रथयात्रेला झेंडा दाखवला.

फक्त सत्ताच नाही तर व्यवस्था परिवर्तन व्हायला हवं. भ्रष्टाचाराच्या विरोधात केंद्र सरकार काहीच करत नाही. याबद्दलच जागृती करण्यासाठी आपण ही जनचेतना यात्रा काढली असल्याचं अडवाणींनी म्हटलंय. 18 राज्यांतून ही यात्रा जाणार आहे. 20 नोव्हेंबरला संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी या यात्रेचा दिल्लीत समारोप होणार आहे. एकूण 75 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाणार आहे. ही यात्रा एकूण 38 दिवसांची आहे.

दरम्यान लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेवर लालू प्रसाद यादव यांनी टीका केली. ही रथयात्रा म्हणजे निव्वळ देखावा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2011 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close