S M L

पंतप्रधानांचं अण्णांना पत्र

11 ऑक्टोबरपंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी अण्णा हजारेंना पत्र लिहून त्यांना आश्वासन दिलंय की ते लोकपाल, निवडणूक सुधारणा आणि ग्रामसभेला सशक्त बनवण्याबद्दल गंभीर आहेत. पंतप्रधान म्हणतात..प्रिय श्री अण्णा हजारे जी,'सशक्त लोकपाल कायदा बनवण्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की निकट भविष्यात आम्ही त्यात यशस्वी होऊ. आमचं सरकार निवडणूक सुधारणासंबंधी अनेक प्रस्तावार सक्रियतेनं विचार करतंय. ज्यात तुम्ही उल्लेख केलेल्या 'राइट टू रिजेक्ट' प्रस्तावाचा समावेश आहे. लोकशाही समाजात काही मुद्द्यांवर राजकीय सहमती आवश्यक असते. निवडणूक सुधारणांबद्दल ज्या मुद्द्यांवर साधारण सहमती बनेल, त्यांवर आम्ही कारवाई करू इच्छितो. ग्रामसभांना सशक्त करण्याबाबत मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. ग्रामसभांना खर्‍या अर्थाने अधिकार संपन्न बनवण्यासाठी आम्ही राज्यांना सोबत घेऊन सतत प्रयत्न करीत आहोत. तुम्ही दिलेल्या सल्ल्यासाठी मी तुमचा पुन्हा आभारी आहे. तुम्हाला शुभेच्छा!' - मनमोहन सिंग

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 11, 2011 05:40 PM IST

पंतप्रधानांचं अण्णांना पत्र

11 ऑक्टोबर

पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी अण्णा हजारेंना पत्र लिहून त्यांना आश्वासन दिलंय की ते लोकपाल, निवडणूक सुधारणा आणि ग्रामसभेला सशक्त बनवण्याबद्दल गंभीर आहेत. पंतप्रधान म्हणतात..प्रिय श्री अण्णा हजारे जी,

'सशक्त लोकपाल कायदा बनवण्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हाला विश्वास आहे की निकट भविष्यात आम्ही त्यात यशस्वी होऊ. आमचं सरकार निवडणूक सुधारणासंबंधी अनेक प्रस्तावार सक्रियतेनं विचार करतंय. ज्यात तुम्ही उल्लेख केलेल्या 'राइट टू रिजेक्ट' प्रस्तावाचा समावेश आहे. लोकशाही समाजात काही मुद्द्यांवर राजकीय सहमती आवश्यक असते. निवडणूक सुधारणांबद्दल ज्या मुद्द्यांवर साधारण सहमती बनेल, त्यांवर आम्ही कारवाई करू इच्छितो. ग्रामसभांना सशक्त करण्याबाबत मी तुमच्याशी पूर्ण सहमत आहे. ग्रामसभांना खर्‍या अर्थाने अधिकार संपन्न बनवण्यासाठी आम्ही राज्यांना सोबत घेऊन सतत प्रयत्न करीत आहोत. तुम्ही दिलेल्या सल्ल्यासाठी मी तुमचा पुन्हा आभारी आहे. तुम्हाला शुभेच्छा!' - मनमोहन सिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 11, 2011 05:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close