S M L

'लोकपाल'बाबत सरकारचा प्रस्ताव घोड्यापुढे गाडी - किरण बेदी

12 ऑक्टोबरलोकपाल समितीला घटनात्मक दर्जाच्या देण्याच्या सरकारच्या वक्तव्यावर टीम अण्णांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. सरकारचा हा प्रस्ताव म्हणजे घोड्यापुढे गाडी ठेवण्यासारखं आहे, असं अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी म्हटलं आहे. तर, लोकपाल विधेयकातील कोणतीही तरतूद डावलण्याचा सरकारचा डाव सहन केला जाणार नाही असा इशारा प्रशांत भूषण यांनी दिला. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचा विचार हा राहुल गांधींचा होता. त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनांवर सरकार विचार करत आहे असं केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितलंय. दरम्यान, लोकपालच्या मुद्द्यावर सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. सरकारने आपला हेतू स्पष्ट करावा आणि सशक्त लोकपाल कायदा लवकरात लवकर आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2011 01:29 PM IST

'लोकपाल'बाबत सरकारचा प्रस्ताव घोड्यापुढे गाडी - किरण बेदी

12 ऑक्टोबर

लोकपाल समितीला घटनात्मक दर्जाच्या देण्याच्या सरकारच्या वक्तव्यावर टीम अण्णांनी सावध प्रतिक्रिया दिलीय. सरकारचा हा प्रस्ताव म्हणजे घोड्यापुढे गाडी ठेवण्यासारखं आहे, असं अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी म्हटलं आहे. तर, लोकपाल विधेयकातील कोणतीही तरतूद डावलण्याचा सरकारचा डाव सहन केला जाणार नाही असा इशारा प्रशांत भूषण यांनी दिला. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचा विचार हा राहुल गांधींचा होता. त्यांच्याकडून मिळालेल्या सूचनांवर सरकार विचार करत आहे असं केंद्रीय कायदामंत्री सलमान खुर्शीद यांनी सांगितलंय. दरम्यान, लोकपालच्या मुद्द्यावर सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. सरकारने आपला हेतू स्पष्ट करावा आणि सशक्त लोकपाल कायदा लवकरात लवकर आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2011 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close