S M L

शिवसेना कार्यालयात मतदार नोंदणीला मनसेचा आक्षेप

उदय जाधव, मुंबई12 ऑक्टोबरमुंबईत येत्या तीन महिन्यांनंतर मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नवीन मतदार नोंदणीचं काम सध्या मुंबईत सुरू आहे. पण वडाळा येथे एका ठिकाणी शिवसेनेच्या कार्यालायतच मतदार नोंदणी सुरू आहे.मुंबईत सध्या मतदार नोंदणीची मोहीम जोरात सुरु आहे. ही सगळी नोंदणी प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते.पण वड्याळ्यात निवडणूक आयोगाची ही मोहीम चक्क शिवसेनेच्याच कार्यातलयात बसून सरु असल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र गेली 20 वर्षे हे असेच सुरु असल्याची कबुली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच दिली. मतदार नोंदणी करणार्‍या या अधिकार्‍यांचे हे पक्षपाती काम मनसेनं आंदोलन करून उघडकीस आणलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला आहे. पण मतदार नोंदणीच्या कामातच जर अशा प्रकारे पक्षपातीपणा होणार असेल, तर निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्हं उभ राहणार नाही का असा प्रश्न आता विचारला जातोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 12, 2011 04:29 PM IST

शिवसेना कार्यालयात मतदार नोंदणीला मनसेचा आक्षेप

उदय जाधव, मुंबई

12 ऑक्टोबर

मुंबईत येत्या तीन महिन्यांनंतर मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नवीन मतदार नोंदणीचं काम सध्या मुंबईत सुरू आहे. पण वडाळा येथे एका ठिकाणी शिवसेनेच्या कार्यालायतच मतदार नोंदणी सुरू आहे.

मुंबईत सध्या मतदार नोंदणीची मोहीम जोरात सुरु आहे. ही सगळी नोंदणी प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते.पण वड्याळ्यात निवडणूक आयोगाची ही मोहीम चक्क शिवसेनेच्याच कार्यातलयात बसून सरु असल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र गेली 20 वर्षे हे असेच सुरु असल्याची कबुली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच दिली.

मतदार नोंदणी करणार्‍या या अधिकार्‍यांचे हे पक्षपाती काम मनसेनं आंदोलन करून उघडकीस आणलं आहे. निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला आहे. पण मतदार नोंदणीच्या कामातच जर अशा प्रकारे पक्षपातीपणा होणार असेल, तर निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्हं उभ राहणार नाही का असा प्रश्न आता विचारला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 12, 2011 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close