S M L

कालव्यात अडकलेल्या वाघिणीची सुखरूप सुटका

13 ऑक्टोबरनागपूर जिल्ह्यातील भिवापूरजवळ असलेल्या तास या गावातील गोसीखुर्द कालव्यात गेल्या 24 तासापासून अडकून असलेल्या वाघिणीची अखेर वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. काल या परिसरात वाघाची डरकाळी ऐकू आल्याने लोकांनी या भागाची पाहणी केली तेव्हा त्यांना ही वाघिण काळव्याच्या जाळीत अडकून असल्याचे दिसून आली. त्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर नागपूरहून विशेष पथक या वाघिणीच्या बचावासाठी बोलविण्यात आलं. ऑपरेशन टायगर मध्ये वनविभागाचे कर्मचारी आणि पर्यावरणवाद्यांनी तब्बल 24 तासानंतर तीला बेशुध्द करून तीस फुट खोल कालव्यातून बाहेर काढलं. या वाघिणीला अनेक जखमा झाल्या आहेत. त्यामुळे वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू सेंटर मध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.पुढचे काही दिवस या वाघिणीवर उपचार केले जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2011 12:01 PM IST

कालव्यात अडकलेल्या वाघिणीची सुखरूप सुटका

13 ऑक्टोबर

नागपूर जिल्ह्यातील भिवापूरजवळ असलेल्या तास या गावातील गोसीखुर्द कालव्यात गेल्या 24 तासापासून अडकून असलेल्या वाघिणीची अखेर वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. काल या परिसरात वाघाची डरकाळी ऐकू आल्याने लोकांनी या भागाची पाहणी केली तेव्हा त्यांना ही वाघिण काळव्याच्या जाळीत अडकून असल्याचे दिसून आली. त्याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर नागपूरहून विशेष पथक या वाघिणीच्या बचावासाठी बोलविण्यात आलं. ऑपरेशन टायगर मध्ये वनविभागाचे कर्मचारी आणि पर्यावरणवाद्यांनी तब्बल 24 तासानंतर तीला बेशुध्द करून तीस फुट खोल कालव्यातून बाहेर काढलं. या वाघिणीला अनेक जखमा झाल्या आहेत. त्यामुळे वाघिणीला वनविभागाच्या रेस्क्यू सेंटर मध्ये उपचारासाठी नेण्यात आलं आहे.पुढचे काही दिवस या वाघिणीवर उपचार केले जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2011 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close