S M L

प्रशांत भूषण टीम अण्णातून जाणार ?

14 ऑक्टोबरकाश्मीर प्रश्नाबाबत प्रशांत भूषण यांच्या भूमिकेवर अण्णा हजारेंनी कडक भूमिका घेतली आहे. काश्मीरप्रश्नी भूषण याचं मत वैयक्तिक आहे. त्यांच ते मत चुकीच असून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असं अण्णा हजारेंनी स्पष्ट् केलं. त्याचबरोबर टीम अण्णा ही फक्त जनलोकपाल आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्णय करण्यासाठीच स्थापन झाली आहे. काश्मीरबाबातचं प्रशांत भूषण यांनी केलेंलं वक्तव हे टीमच्या सदस्यांना विचारून केलेलं नाही. त्यामुळे इथून पुढे त्यांना टीममध्ये ठेवायचं की नाही याविषयी आता इतर सदस्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं अण्णांनी म्हटलं आहे.दोन दिवसांपूर्वी टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकिल प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टात त्यांच्या 301 चेंबरमध्ये घुसून भगतसिंग क्रांतीसेनेच्या तीन कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नी आम्ही अनेक सामाजिक संघटनांशी मिळून काम करत आहोत. लष्कराचा विशेषाधिकार कायदा काढण्यासाठी मोहीम सुरू आहे. विशेषाधिकारांमुळेच लष्कराचे जवान दबाव आणतात. हे एक कारण आहे. त्यामुळेच मानवाधिकार संघटना जे काही योग्य आहे ते करू शकतात. जिथं पीडित लोक आवाज उठवतात तिथं तो मुद्दा उचलायलाच हवा. अशा पीडितांचा तुम्ही मुद्दा हाती घेतला तर ते फायद्याचंच ठरेल. असं विधान केलं होतं याचा आक्षेप घेत भगतसिंग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. तर काल पुन्हा भगतसिंग क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णा समर्थकांना बेदम चोप दिला. भूषण यांना मारहाण करणार्‍या हल्लेखोरांना दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले यावेळी कोर्टाबाहेर जमलेले अण्णांना समर्थकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन अण्णा समर्थक गंभीर जखमी झाले होते. आज अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रशांत भूषण यांचं टीम अण्णातून जाण्याचे संकेत दिले आहे. काश्मीर प्रश्नाबाबत भूषण यांनी केलेले विधान चुकीचे आहे असं स्पष्टपणे अण्णांनी सांगितले तसेच काश्मीरप्रश्नी भूषण याचं ते वैयक्तिक मत आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर टीम अण्णा ही फक्त जनलोकपाल आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्णय करण्यासाठीच स्थापन झाली आहे. काश्मीरबाबातचं प्रशांत भूषण यांनी केलेंलं वक्तव हे टीमच्या सदस्यांना विचारून केलेलं नाही. त्यामुळे इथून पुढे त्यांना टीममध्ये ठेवायचं की नाही याविषयी आता इतर सदस्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं अण्णांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2011 09:32 AM IST

प्रशांत भूषण टीम अण्णातून जाणार ?

14 ऑक्टोबर

काश्मीर प्रश्नाबाबत प्रशांत भूषण यांच्या भूमिकेवर अण्णा हजारेंनी कडक भूमिका घेतली आहे. काश्मीरप्रश्नी भूषण याचं मत वैयक्तिक आहे. त्यांच ते मत चुकीच असून काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, असं अण्णा हजारेंनी स्पष्ट् केलं. त्याचबरोबर टीम अण्णा ही फक्त जनलोकपाल आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्णय करण्यासाठीच स्थापन झाली आहे. काश्मीरबाबातचं प्रशांत भूषण यांनी केलेंलं वक्तव हे टीमच्या सदस्यांना विचारून केलेलं नाही. त्यामुळे इथून पुढे त्यांना टीममध्ये ठेवायचं की नाही याविषयी आता इतर सदस्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं अण्णांनी म्हटलं आहे.

दोन दिवसांपूर्वी टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकिल प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टात त्यांच्या 301 चेंबरमध्ये घुसून भगतसिंग क्रांतीसेनेच्या तीन कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करण्यात आली होती. काही दिवसांपुर्वी प्रशांत भूषण यांनी काश्मीर प्रश्नी आम्ही अनेक सामाजिक संघटनांशी मिळून काम करत आहोत. लष्कराचा विशेषाधिकार कायदा काढण्यासाठी मोहीम सुरू आहे. विशेषाधिकारांमुळेच लष्कराचे जवान दबाव आणतात. हे एक कारण आहे. त्यामुळेच मानवाधिकार संघटना जे काही योग्य आहे ते करू शकतात. जिथं पीडित लोक आवाज उठवतात तिथं तो मुद्दा उचलायलाच हवा. अशा पीडितांचा तुम्ही मुद्दा हाती घेतला तर ते फायद्याचंच ठरेल. असं विधान केलं होतं याचा आक्षेप घेत भगतसिंग क्रांतीसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. तर काल पुन्हा भगतसिंग क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी अण्णा समर्थकांना बेदम चोप दिला. भूषण यांना मारहाण करणार्‍या हल्लेखोरांना दिल्लीतल्या पतियाळा हाऊस कोर्टात हजर करण्यात आले यावेळी कोर्टाबाहेर जमलेले अण्णांना समर्थकांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तीन अण्णा समर्थक गंभीर जखमी झाले होते. आज अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट करत प्रशांत भूषण यांचं टीम अण्णातून जाण्याचे संकेत दिले आहे.

काश्मीर प्रश्नाबाबत भूषण यांनी केलेले विधान चुकीचे आहे असं स्पष्टपणे अण्णांनी सांगितले तसेच काश्मीरप्रश्नी भूषण याचं ते वैयक्तिक मत आहे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं अण्णा हजारेंनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर टीम अण्णा ही फक्त जनलोकपाल आणि भ्रष्टाचार मुक्त भारत निर्णय करण्यासाठीच स्थापन झाली आहे. काश्मीरबाबातचं प्रशांत भूषण यांनी केलेंलं वक्तव हे टीमच्या सदस्यांना विचारून केलेलं नाही. त्यामुळे इथून पुढे त्यांना टीममध्ये ठेवायचं की नाही याविषयी आता इतर सदस्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ असं अण्णांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2011 09:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close