S M L

प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला पूर्वनियोजित - केजरीवाल

14 ऑक्टोबरजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं काही वेळापुर्वीच स्पष्ट केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही अण्णांच्या विधानाला दुजोरा देत प्रशांत भूषण यांचे काश्मिरवरील वक्तव्य हे वैयक्तिक मत आहे असं स्पष्ट केलं. आणि याचा टीम अण्णांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मात्र प्रशांत भूषण हे टीम अण्णांचे महत्वाचे सदस्य आहेत. ते कोअर कमिटीचे सदस्य राहणारचं याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. इतकचं नाही तर अण्णांचे सहकारी आणि अण्णा समर्थकांवर होणारे हल्ले हे पूर्वनियोजित असल्याचा आरोपसुद्धा केजरीवाल यांनी केला. जे लोक भ्रष्टाचार करतात त्यांनी एकत्र येऊ न हे हल्ले केल्याचं त्यंानी म्हटलं आहे. तर दिल्ली पोलीस या संदर्भात कारवाई करण्यास दिरंगाई का करत आहे असा सवालही त्यांनी केला. टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांच्यावर हल्ल्यानंतर टीम अण्णांनी दिल्लीत कोअर कमिटीची बैठक काहीवेळापूर्वी पार पडली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2011 12:06 PM IST

प्रशांत भूषण यांच्यावर हल्ला पूर्वनियोजित - केजरीवाल

14 ऑक्टोबर

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं काही वेळापुर्वीच स्पष्ट केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही अण्णांच्या विधानाला दुजोरा देत प्रशांत भूषण यांचे काश्मिरवरील वक्तव्य हे वैयक्तिक मत आहे असं स्पष्ट केलं. आणि याचा टीम अण्णांशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मात्र प्रशांत भूषण हे टीम अण्णांचे महत्वाचे सदस्य आहेत. ते कोअर कमिटीचे सदस्य राहणारचं याचंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. इतकचं नाही तर अण्णांचे सहकारी आणि अण्णा समर्थकांवर होणारे हल्ले हे पूर्वनियोजित असल्याचा आरोपसुद्धा केजरीवाल यांनी केला. जे लोक भ्रष्टाचार करतात त्यांनी एकत्र येऊ न हे हल्ले केल्याचं त्यंानी म्हटलं आहे. तर दिल्ली पोलीस या संदर्भात कारवाई करण्यास दिरंगाई का करत आहे असा सवालही त्यांनी केला. टीम अण्णांचे सदस्य आणि सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत भूषण यांच्यावर हल्ल्यानंतर टीम अण्णांनी दिल्लीत कोअर कमिटीची बैठक काहीवेळापूर्वी पार पडली. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2011 12:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close