S M L

गोंदियात गर्भवती महिलांसाठी 'माहेरघर' उपक्रम

16 ऑक्टोबरनक्षलग्रस्त गोंदिया जिल्हात आरोग्य विभागातर्फे माहेरघर अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अंतर्गत नक्षलग्रस्त भागातील महिलांना आरोग्य केंद्रात अगदी त्यांच्या माहेरसारखी वागणूक दिला जातेय. नक्षलग्रस्त भागातील प्रिती सुलाखे आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी कावराबंाधच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालीय. डिलिव्हरी तारखेच्या 5 दिवस आधीच ती आरोग्य केंद्राच्या माहेरघरात आली. कारण इथं मिळणार्‍या आरोग्य सुविधांबद्दल तिला विश्वास आहे.आरोग्य विभागाने तीन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसोयीयुक्त 'माहेरघर' बांधलंय. कावराबंाधच्या या केंद्रात सुसज्ज बेड, लॅबोरेटरी आणि पुरेसा औषधसाठा आहे. शिवाय मनोरंजनासाठी टीव्हीची सोय आहे. 12 माहेरघर, 16 धर्मशाळा बांधल्यात. त्याच लाभ 90 गावांना मिळणार आहे. तीन फिरती रुग्णालय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्याचबरोबर नवजात बाळाला नवे कपडे, आईला साडी चोळी देण्याचाही व्यवस्था करण्यात आली आहे. बरोबरच्या नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था धर्मशाळेत करण्यात आली. धर्मशाळेत गॅस आणि पाण्याची विनामुल्य सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरी भागातही जिथं हेळसांड होते, अशावेळी नक्षलग्रस्त भागातील या माहेरघरांमुळे गरोदर माताही विश्वासने सरकारी आरोग्यकेंद्रामध्ये येतात.आरोग्य केंद्राचं 'माहेरघर'- 12 माहेरघरं, 16 धर्मशाळा - 90 गावांना लाभ- 3 फिरती रुग्णालय - बाळाला नवे कपडे, आईला साडी-चोळी - धर्मशाळेत नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था - गॅस आणि पाण्याची विनामूल्य सुविधा

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 16, 2011 04:17 PM IST

गोंदियात गर्भवती महिलांसाठी 'माहेरघर' उपक्रम

16 ऑक्टोबर

नक्षलग्रस्त गोंदिया जिल्हात आरोग्य विभागातर्फे माहेरघर अभियान हाती घेण्यात आलं आहे. या अंतर्गत नक्षलग्रस्त भागातील महिलांना आरोग्य केंद्रात अगदी त्यांच्या माहेरसारखी वागणूक दिला जातेय. नक्षलग्रस्त भागातील प्रिती सुलाखे आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी कावराबंाधच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालीय. डिलिव्हरी तारखेच्या 5 दिवस आधीच ती आरोग्य केंद्राच्या माहेरघरात आली. कारण इथं मिळणार्‍या आरोग्य सुविधांबद्दल तिला विश्वास आहे.

आरोग्य विभागाने तीन तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसोयीयुक्त 'माहेरघर' बांधलंय. कावराबंाधच्या या केंद्रात सुसज्ज बेड, लॅबोरेटरी आणि पुरेसा औषधसाठा आहे. शिवाय मनोरंजनासाठी टीव्हीची सोय आहे. 12 माहेरघर, 16 धर्मशाळा बांधल्यात. त्याच लाभ 90 गावांना मिळणार आहे. तीन फिरती रुग्णालय उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

त्याचबरोबर नवजात बाळाला नवे कपडे, आईला साडी चोळी देण्याचाही व्यवस्था करण्यात आली आहे. बरोबरच्या नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था धर्मशाळेत करण्यात आली. धर्मशाळेत गॅस आणि पाण्याची विनामुल्य सुविधा उपलब्ध होणार आहे. शहरी भागातही जिथं हेळसांड होते, अशावेळी नक्षलग्रस्त भागातील या माहेरघरांमुळे गरोदर माताही विश्वासने सरकारी आरोग्यकेंद्रामध्ये येतात.

आरोग्य केंद्राचं 'माहेरघर'

- 12 माहेरघरं, 16 धर्मशाळा - 90 गावांना लाभ- 3 फिरती रुग्णालय - बाळाला नवे कपडे, आईला साडी-चोळी - धर्मशाळेत नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था - गॅस आणि पाण्याची विनामूल्य सुविधा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 16, 2011 04:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close