S M L

हिसार पोटनिवडणुकीत एनडीएचे बिश्नोई विजयी ;युपीए तिसर्‍या स्थानावर

17 ऑक्टोबरहरियाणाच्या हिसार पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. आणि एनडीएची सरशी झाली. हरियाणा जनहित काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई यांचा दणदणीत विजय झाला आहे. इंडियन नॅशनल लोकदलाचे अजयसिंह चौटाला दुसर्‍या क्रमांकावर तर काँग्रेसचे जयप्रकाश तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. हरियाणा जनहित काँग्रेसची भाजपसोबत आघाडी आहे. या निवडणुकीत टीम अण्णांनी काँग्रेसविरोधात जोरदार प्रचार केला होता. पण विजयाचे श्रेय टीम अण्णांना द्यायला बिश्नोई यांनी नकार दिला आहे. दुसरीकडे, हा टीम अण्णांचा विजय नाही तर पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात प्रचार केला होता, तर काँग्रेसचाच उमेदवार इथं निवडून यायला हवा होता, असं वीरप्पा मोईली यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2011 09:58 AM IST

हिसार पोटनिवडणुकीत एनडीएचे बिश्नोई विजयी ;युपीए तिसर्‍या स्थानावर

17 ऑक्टोबर

हरियाणाच्या हिसार पोटनिवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. आणि एनडीएची सरशी झाली. हरियाणा जनहित काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई यांचा दणदणीत विजय झाला आहे. इंडियन नॅशनल लोकदलाचे अजयसिंह चौटाला दुसर्‍या क्रमांकावर तर काँग्रेसचे जयप्रकाश तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. हरियाणा जनहित काँग्रेसची भाजपसोबत आघाडी आहे. या निवडणुकीत टीम अण्णांनी काँग्रेसविरोधात जोरदार प्रचार केला होता. पण विजयाचे श्रेय टीम अण्णांना द्यायला बिश्नोई यांनी नकार दिला आहे. दुसरीकडे, हा टीम अण्णांचा विजय नाही तर पराभव आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. अण्णांनी भ्रष्टाचाराविरोधात प्रचार केला होता, तर काँग्रेसचाच उमेदवार इथं निवडून यायला हवा होता, असं वीरप्पा मोईली यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2011 09:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close