S M L

युवासेना झाली एका वर्षाची !

17 ऑक्टोबरशिवसेनेची नवी अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या एका नव्या संघटनेची घोषणा केली. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या प्रमुख मुद्दयांसह युवानेता अदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली युवासेनेने गेल्या वर्षभरात युवकांचे अनेक प्रश्न हाताळले.गेल्या वर्षी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी आठ जागा जिंकत युवासेनेने जबरदस्त यश मिळवलं आणि विरोधकांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावली. त्यानंतरही अण्णा हजारेंच्या आंदोलनादरम्यान त्यांची घेतलेली भेट असो, की गणपती विसर्जनानंतर चौपाट्यांवर घेतलेली स्वच्छता मोहीम असो, अशा अनेक उपक्रमाद्वारे युवासेना चर्चेत राहिली. मुंबई विद्यापीठाच्या हॉकी संघनिवडीत हस्तक्षेप करत युवासेनेने स्थानिक पात्र खेळाडूंची मदत केली. शिवसेनेच्या राडा संस्कृतीतून बाहेर पडत युवासेनेने आपली एक वेगळी कार्यपद्धती तयार केली.उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा सांभाळल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत तरूण आणि नव्या चेहर्‍यांना प्राधान्य दिलं. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीतही आदित्य ठाकरेंच्या हाताला आणखी बळ देण्याकरता युवासेनेचे काही पदाधिकारी शिवसेनेचे उमेदवार म्हणून दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2011 03:29 PM IST

युवासेना झाली एका वर्षाची !

17 ऑक्टोबर

शिवसेनेची नवी अंगीकृत संघटना असलेल्या युवासेनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. गेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या एका नव्या संघटनेची घोषणा केली. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या प्रमुख मुद्दयांसह युवानेता अदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली युवासेनेने गेल्या वर्षभरात युवकांचे अनेक प्रश्न हाताळले.

गेल्या वर्षी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत दहा पैकी आठ जागा जिंकत युवासेनेने जबरदस्त यश मिळवलं आणि विरोधकांना आपल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावली. त्यानंतरही अण्णा हजारेंच्या आंदोलनादरम्यान त्यांची घेतलेली भेट असो, की गणपती विसर्जनानंतर चौपाट्यांवर घेतलेली स्वच्छता मोहीम असो, अशा अनेक उपक्रमाद्वारे युवासेना चर्चेत राहिली. मुंबई विद्यापीठाच्या हॉकी संघनिवडीत हस्तक्षेप करत युवासेनेने स्थानिक पात्र खेळाडूंची मदत केली. शिवसेनेच्या राडा संस्कृतीतून बाहेर पडत युवासेनेने आपली एक वेगळी कार्यपद्धती तयार केली.

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची धुरा सांभाळल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत तरूण आणि नव्या चेहर्‍यांना प्राधान्य दिलं. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीतही आदित्य ठाकरेंच्या हाताला आणखी बळ देण्याकरता युवासेनेचे काही पदाधिकारी शिवसेनेचे उमेदवार म्हणून दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2011 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close